शाहरुखच्या KKR ची मोठी खेळी; अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये मारली उडी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Tuesday, 1 December 2020

या स्पर्धेसाठी नाईट रायडर्सने गुंतवणुकीचा करार केला आहे. शाहरुख खानने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून आम्ही जागतिक स्तरावर ब्रँडचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  अमेरिकेत नियोजित टी20 क्रिकेट स्पर्धेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ही स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही शाहरुखने म्हटले आहे. आयपीएलच्या धर्तीवर तयार करणाऱ्या स्पर्धेच्या आखाड्यात दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू सामील होऊ शकतील. 

कोलकाता : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सह मालकीच्या नाइट रायडर्स ग्रुपने मंगळवारी अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये गुंतवणूक केल्याची घोषणा केली. अमेरिका क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या स्पर्धेत लाखो डॉलरची उलाढाल अपेक्षित आहे.

या स्पर्धेसाठी नाईट रायडर्सने गुंतवणुकीचा करार केला आहे. शाहरुख खानने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून आम्ही जागतिक स्तरावर ब्रँडचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  अमेरिकेत नियोजित टी20 क्रिकेट स्पर्धेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ही स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही शाहरुखने म्हटले आहे. आयपीएलच्या धर्तीवर तयार करणाऱ्या स्पर्धेच्या आखाड्यात दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू सामील होऊ शकतील. 

फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टनला कोरोनाची लागण

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने अमेरिकेत रंगणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेत गुंतवणूक केली आहे. याशिवाय किंग खान The Hundred लीगमध्ये गुंतवणूक करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ( ECB) 2020 पासून या लीगचं आयोजन करण्यात येणार होतं. पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ही लीग 2021मध्ये घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या लीगमध्येही शाहरुखचा संघ दिसला तर नवल वाटणार नाही.

फॉर्म्युला वनमधील धोका पुन्हा अधोरेखित 

क्रिकबझच्या वृत्तानुसार, नाईट रायडर्स  लॉस एंजिल्सची फ्रेंचायजी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनी देखील लीगमधील गुंतवणीकीसंदर्भात पुसटशी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या फ्रेंचायजीला जगभरातून अनेक क्रीडा क्षेत्रातील लीगकडून प्रस्ताव येत आहेत. अमेरिका जगातील सर्वात मोठी मीडिया बाजारपेठ आहे. यात आम्हाला खूप संधी मिळेल. अमेरिकेत क्रिकेटसाठी चांगली संधी असून यातील सहभाग फायदेशीर ठरेल असे वाटते. अमेरिकन लीगसंदर्भात आमच्याकडे सध्याच्या घडीला सविस्तर माहिती नाही. पण सहा फ्रेंचायजींकडे सामुहिकरित्या 75 टक्के हिस्सेदारी मिळू शकते, अशी माहिती वेंकी मैसूर यांनी दिली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या