राहुल गांधींसाठी भज्जीनं केली प्रार्थना, ट्विट व्हायरल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

राहुल गांधींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना भज्जीने या ट्विटच्या माध्यमातून केलीय. हरभजन सिंगने ट्विटमध्ये लिहिलंय की, राहुल गांधीजी आपण लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो.

देशात कोरोनाची लाट पुन्हा एकदा उसळली आहे. देश पुन्हा लॉकडाऊन होत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.  

राहुल गांधींच्या ट्विटनंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात असलेल्या हरभजन सिंगने एक ट्विट केले आहे. राहुल गांधींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना भज्जीने या ट्विटच्या माध्यमातून केलीय. हरभजन सिंगने ट्विटमध्ये लिहिलंय की, राहुल गांधीजी आपण लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो.

IPL 2021: धोनी लवकरच थांबेल, वॉनचं CSK च्या नव्या कॅप्टनसंदर्भात मोठे विधान 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. देशात  2 लाख 56 हजार 596 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांचा आकडा हा धास्ती वाढवणारा आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार देशात 1757 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाचा आकडा हा दीड कोटीहून अधिक झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या