बांबूची नव्हे, लाकडाचीच बॅट; नव्या प्रयोगाला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

मुळात क्रिकेट हा फलदाजांकडे झुकलेला खेळ... बॅट नही हतोडा असे म्हणत गोलदाजांची बेदम पिटाई फलंदाज ज्या बॅटने करतात त्यात आता नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता; परंतु क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिर्लबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) पारंपरिक बॅटच कायम ठेवली.

लंडन - मुळात क्रिकेट हा फलदाजांकडे झुकलेला खेळ... बॅट नही हतोडा असे म्हणत गोलदाजांची बेदम पिटाई फलंदाज ज्या बॅटने करतात त्यात आता नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता; परंतु क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिर्लबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) पारंपरिक बॅटच कायम ठेवली. 

त्याचे असे झाले... क्रिकेटमध्ये वापरण्यात येत असलेली पारपंरिक बॅट ही लाकडापासून (विलो) तयार केली जात असते; परंतु अगोदर झाड त्यानंतर त्याचे लाकूड हे आर्थिक गणिक आता खर्चिक होत असल्याने केंब्रिज विद्यापीठाच्या दर्शिल शहा आणि बेन टिंक्लर-डेव्हिस यांनी बांबूपासून बॅट तयार केली. आर्थिकदृष्ट्या ही स्वस्त आहे; पण फारच कडक आणि टणक आहे. क्रिकेटविश्वात या बांबूच्या बॅटची चर्चा सुरू झाली नि उत्सुकताही वाढली; परंतु मेरिर्लबोर्न क्रिकेट क्लबने ही बॅट आयसीसीच्या नियमात बसणारी नाही, असे सांगून पूर्णविराम दिला.

बॅट संदर्भातील ५.३.२ या कलमानुसार बॅट ही पूर्णपणे लाकडाचीच असणे आवश्यक आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रकारची बॅट ग्राह्य धरली जाणार नाही, असे एमसीसीने म्हटले आहे.

बांबूची बॅट टणक आणि कडक असणार आहे. अशा बॅटला लागलेले यॉर्कर चेंडूही सहजपणे सीमापार जातील, असे बांबूपासून बॅट तयार करणाऱ्या दर्शिल शहाने म्हटले होते. क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडू यांचा समतोल असणे आवश्यक आहे. कोणालाही झुकते माप मिळणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण एमसीसीने दिल्यामुळे बांबूच्या बॅटचा प्रश्न निकाली निघाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या