बुमरा-शमीला कमी लेखण्याची चूक : रूट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 August 2021

रिषभ पंत बाद झाल्यावर सामना आमच्या हातात आला होता, पण आम्ही जसप्रीत बुमरा आणि महम्मद शमी यांना कमी लेखण्याची चूक केली, अशी कबुली इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने दिली. त्यांच्या भागीदारीने सामना आमच्यापासून लांब गेला.

लंडन - रिषभ पंत बाद झाल्यावर सामना आमच्या हातात आला होता, पण आम्ही जसप्रीत बुमरा आणि महम्मद शमी यांना कमी लेखण्याची चूक केली, अशी कबुली इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने दिली. त्यांच्या भागीदारीने सामना आमच्यापासून लांब गेला. दुसरा डाव संपवता आला नाही तिथेच समीकरण बदलले. तळातले फलंदाज असा प्रतिकार करू शकतात याचा अंदाज आम्ही घेतला नाही. क्षेत्ररचना वेगळी लावायला हवी होती आणि माऱ्‍याची दिशा वेगळी ठेवायला हवी होती. कर्णधार म्हणून ही माझी जबाबदारी आहे, हेसुद्धा रूटने मान्य केले.

भारतीय खेळाडूंना विजयाचे श्रेय द्यावे लागेल. त्यांनी अनपेक्षितपणे फटकेबाजी करून धावा जमा केल्या. दडपणाखाली तग धरला. तळातील फलंदाजांच्या धावा रोखण्यापेक्षा त्यांना बाद करायचा प्रयत्न करायला हवा होता, असे रूटने बोलताना सांगितले.

दुसऱ्या डावात इंग्लंड संघ लवकर बाद झाला त्या वेळी कप्तान विराट कोहली संपूर्ण संघाला अत्यंत आक्रमक पद्धतीने हाताळत होता. मैदानावरच्या त्याच्या हालचाली कमालीच्या आक्रमक होत्या, त्याबद्दल बोलताना ज्यो रूट म्हणाला, माझी आणि विराटची मैदानावर वावरण्याची शैली भिन्नं आहे. मी इतकेच म्हणेन, की मैदानावर घडलेल्या काही प्रसंगांनी त्यांनी भावनिक धागा पकडून विजयाकडे वाटचाल केली.


​ ​

संबंधित बातम्या