एकदिवसीय क्रिकेटवर मिताली 'राज'; महिला क्रिकेटरची पहिल्यांदाच अशी कामगिरी

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आणखी एक विक्रम केला आहे. याआधीच्या सामन्यात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

लखनऊ - दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून चौथ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आणखी एक विक्रम केला आहे. याआधीच्या सामन्यात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. लखनऊमध्ये होत असलेल्या सामन्यात मिताली राजने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामिगिरी करणारी ती जगाती पहिलीच महिला फलंदाज ठरली आहे. मिताली राजसह भारताच्या पूनम राऊतनेसुद्धा इतिहास रचला आहे. 

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने 213 व्या सामन्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सात ङजार धावांचा टप्पा ओलांडला. मितालीच्या या कामगिरीनंतर बीसीसीआयने तिचे अभिनंदन केलं आहे.  याआधी मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मितालीने एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. दहा हजार धावा करणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या आधी शार्लेट एडवर्ड्सने अशी कामगिरी केली होती.

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राज याआधी 6000 धावा करण्याचा टप्पा पूर्ण करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली होती. दहा हजार धावा करणाऱ्या शार्लोट एडवर्ड्सने 2016 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 हजार 992 धावा केल्या आहेत. 

हे वाचा - युवराजची अष्टपैलू खेळी; दक्षिण आफ्रिका लिजंड्सला नमवून भारत सेमीफायनलमध्ये

पूनम राऊतची शतकी खेळी
पूनम राऊत ही सध्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या दोन सामन्यात तिने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या सामन्यात पूनमने शतकी खेळी केली. तिने 123 चेंडूत 10 चौकारांसह तिने नाबाद 104 धावा केल्या. तिने 119 चेंडूत शतक पूर्ण केलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक कऱणाऱ्या महिलांमध्ये पूनम 19 व्या स्थानी आहे. तर सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये ती तिसऱ्या स्थानावर आहे. पूनम राऊतने 71 व्या सामन्यात ही कामगिरी केली असून तिच्यापेक्षा जास्त मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी शकते केली आहे. भारताची महिला टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेसुद्धा आतापर्यंत तीन एकदिवसीय शतके केली आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या