धावांची भूक सतत वाढतीच; मिताली राज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

बावीस वर्षे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, पण धावांची भूक सातत्याने वाढतच आहे. सातत्याने अधिकाधिक धावा करून भारतास कसे विजयी करता येईल, यासाठीच प्रयत्न असते, असे मितालीने सांगितले.

ब्रिस्टॉल - बावीस वर्षे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, पण धावांची भूक सातत्याने वाढतच आहे. सातत्याने अधिकाधिक धावा करून भारतास कसे विजयी करता येईल, यासाठीच प्रयत्न असते, असे मितालीने सांगितले.

मिताली महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज झाली आहे. याबाबत ती म्हणाली, गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टी घडल्या. हा प्रवास सोपा नव्हता, त्यात अनेक आव्हाने होती, पण त्यातूनही ध्येय साध्य होते, यावर माझा विश्वास आहे. अनेकदा खेळाचा निरोप घेण्याचा विचार केला, पण प्रत्येक वेळी काहीतरी बाब खेळण्याची इच्छा निर्माण करीत होती, असे मितालीने सांगितले. मितालीने सलग तिसऱ्या सामन्यात धावा केल्या, पण ती खूपच कूर्मगती फलंदाजी करते, अशी टीका झाली. टीकाकारांच्या प्रमाणपत्रासाठी मी खेळत नाही. संघाची गरज जाणते आणि त्यानुसार खेळते, असे तिने सांगितले. 

अव्वल मिताली

  • १०,३३७ धावा - मितालीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील, चार्लोती एडवर्डस््ला (१०,२७३) मागे टाकले
  • ८४ - मिताली कर्णधार असताना भारतीय महिला संघाने मिळवलेले एकूण विजय. सर्वाधिक विजयाच्या क्रमवारीत अव्वल. बेलिंडा क्लार्कला (८३) मागे टाकले
  • ६००० धावा - मितालीने कर्णधार असताना केलेल्या धावा
  • १२ जुलै २०१७ - मितालीने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत एडवर्डस््ला मागे टाकले होते
  • ६००० महिला एकदिवसीयमध्ये धावा केलेली पहिली फलंदाज.
  • ३ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीनही सामन्यात शतके. ही कामगिरी करणारी पहिली फलंदाज

​ ​

संबंधित बातम्या