मिताली राजने दिले निवृत्तीचे संकेत

पीटीआय
Sunday, 25 April 2021

महिला क्रिकेटमध्ये देशाची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या मिताली राजने निवृत्तीचे संकेत दिले आहे. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारी ५०-५० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आपल्या २१ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल असे सूतोवाच मितालीने केली आहे.

नवी दिल्ली - महिला क्रिकेटमध्ये देशाची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या मिताली राजने निवृत्तीचे संकेत दिले आहे. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारी ५०-५० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आपल्या २१ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल असे सूतोवाच मितालीने केली आहे.

३८ वर्षीय मिताली भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू ओळखली जाते. गेली २१ वर्षे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. २०२२ हे वर्ष खेळाडू म्हणून आपले अंतिम वर्ष असेल असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात हजारांहून अधिक धावा करणारी एकमेव महिला क्रिकेटपटू असल्या मितालीने कोविड-१९ च्या महामारीतही स्वतःला नेहमीच प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले. 

सध्या आपण सर्वच जण कठीण काळातून जात आहोत. पण याचा उपयोग मी  स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करत आहे. आता या वयात मी काही तरुण होणार नाही, पण तंदुरुस्ती तरी आपण कायम ठेऊ शकतो याच विचाराने मी मेहनत घेत आहे. न्यूझीलंडमधील विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत मानसिकदृष्ट्याही सक्षम असणे आवश्‍यक असल्याचे ती म्हणाली.

कोविड -१९ महामारी सुरू होत असताना भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळला होता त्यानंतर वर्षभर तरी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नव्हते. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका झाली होती.


​ ​

संबंधित बातम्या