मुंबई, चेन्नईचे संघ उद्या अमिरातीत?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

चेन्नई सुपर किंग्ज संघाप्रमाणे मुंबई इंडियन्सही आयपीएलसाठी एक महिन्यापेक्षा अधिक काळ असतानाच अमिरातीत दाखल होण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघाप्रमाणे मुंबई इंडियन्सही आयपीएलसाठी एक महिन्यापेक्षा अधिक काळ असतानाच अमिरातीत दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि सलामीला लढणारे हे दोन्ही संघ शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजीच अमिराती गाठण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. अमिरातीकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे. आमच्याप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जचा संघही अमिरातीला प्रयाण करण्याच्या तयारीत आहे. आमचे खेळाडू येथील जैवसुरक्षा वातावरणातून तेथील जैवसुरक्षा वातावरणात दाखल होतील; तरीही आमचे खेळाडू अमिरातीत जाऊन तेथील नियमाप्रमाणे विलगीकरणास तयार आहेत, असे मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी सांगितले. 

मुंबई इंडियन्स संघातील स्थानिक खेळाडूंचे विलगीकरण झाल्यानंतर ते दोन आठवड्यांपासून रिलायन्सच्या घणसोली येथील कॉर्पोरेट पार्कवर सरावही करत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या