MI च्या स्फोटक फलंदाजाला पितृशोक; सचिननं दिला धीर

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

पोलार्डने इन्स्टाच्या माध्यमातून वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. त्याने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केलाय.

वेस्ट इंडिज संघाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू असलेल्या केरॉन पोलार्ड (kieron pollard) च्या वडिलांचे निधन झाले आहे.  कॅरेबियन स्फोटक फलंदाज पोलार्डने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: यासंदर्भात माहिती दिलीय. पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीजच्या संघाने टी-20 आणि वनडे मालिकेत श्रीलंकेला पराभूत केले होते. 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.  

पोलार्डने इन्स्टाच्या माध्यमातून वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. त्याने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत पोलार्ड आपल्या वडिलांसोबत मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसतोय. त्याच्या वडिलांच्या हातात आयपीएल ट्रॉफीही दिसते आहे. तुम्ही अनेक लोकांच्या मनात स्थान मिळवले असून तुमच्याबद्दलचा अभिमान कायम मनात घर करुन राहील, अशी भावनिक पोस्ट पोलार्डने लिहिली आहे.  

जोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने ट्विटरच्या माध्यमातून पोलार्डला धीर दिला आहे. पोलार्डच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहिलंय की, मला तुझ्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी समजली. कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून परमेश्वर तुम्हाला यातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना सचिन तेंडुलकरने केली आहे. 

पोलार्डचं बालपण गरिबीत 

पोलार्डच बालपण हे खुपच गरिबीत गेले. 12 मे 1987 मध्ये त्रिनिनाद अँण्ड टोबॅगो याठिकाणी त्याचा जन्म झाला. वडिल आईला सोडून निघून गेल्यानंतर पोलार्डचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी त्याच्या आईने पार केली. क्रिकेटने पोलार्डचे आयुष्य बदलले आणि त्याचे वडिल अनेक कार्यक्रमात त्याच्यासोबत दिसले होते.  


​ ​

संबंधित बातम्या