''विराटच्या अनुपस्थितही भारतीय फलंदाजांना रोखणं हे मोठे आव्हान'' 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1 - 0 ने बढत मिळवली आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी पुन्हा मायदेशी परतला असल्यामुळे, आगामी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. आणि त्याच्या समोर भारतीय संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर परत आणण्याचे मोठे आव्हान असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना येत्या शनिवारपासून खेळवण्यात येणार आहे. आणि या सामन्याच्या पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज नॅथन लियॉनने भारतीय फलंदाजांसंबंधित बोलताना, दुसऱ्या सामन्यात त्यांना रोखणे ऑस्ट्रेलिया संघासमोर मोठे आव्हान राहणार असल्याचे म्हटले आहे. 

पॅटर्निटी लिव्ह साठी कर्णधार विराट कोहली मायदेशी रवाना 

ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करल्याचे दिसले होते. या सामन्यात अजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही अपयशी ठरले होते. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये या फलंदाजांना रोखाने हे मोठे आव्हान असल्याचे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने म्हटले आहे. त्यामुळे या फलंदाजांसाठी आगामी सामन्यात विशेष रणनीती आखल्याचे देखील नॅथन लियॉनने नमूद केले. 

तसेच जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसमोर स्वतःला सिद्ध करणे हे मोठे आव्हान असते. आणि चेतेश्वर पुजारा हा त्यांपैकीच एक असल्याचे नॅथन लियॉनने म्हटले आहे. शिवाय पुजारा मैदानावर आल्यानंतर ठरलेल्या रणनीतीनुसार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नॅथन लियॉन म्हणाला. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जरी खेळणार नसला तरी संघातील उर्वरीत खेळाडूंना रोखणे हे कठीण असल्याचे मत नॅथन लियॉनने व्यक्त केले. त्यामुळे भारतीय संघाकडे विराट कोहलीची जागा भरून काढण्यासाठी इतर दमदार खेळाडू असल्याचे नॅथन लियॉनने पुढे सांगितले. 

सिडनीत वाढतोय कोरोना; रोहित अपार्टमेंटमधील 2 बेडरुमध्ये क्वारंटाईन

चेतेश्वर पुजारा, अजिक्य रहाणे यांच्यासोबतच मयांक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यासारखे खेळाडू भारतीय संघात असल्यामुळे या सर्वांना रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. त्याशिवाय पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात जोमाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. व त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार असल्याचे नॅथन लियॉनने पुढे अधोरेखित केले.             


​ ​

संबंधित बातम्या