मुंबई प्रशिक्षकांसाठी तारीख पे तारीख; सचिवांकडून आता आजचा वायदा  

संजय घारपुरे
Wednesday, 16 December 2020

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांच्या घोषणेसाठी सातत्याने नवी तारीखच दिली जात आहे. संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी आता उद्याचा (ता. 17) वायदा केला आहे. 

मुंबई : मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांच्या घोषणेसाठी सातत्याने नवी तारीखच दिली जात आहे. संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी आता उद्याचा (ता. 17) वायदा केला आहे. 

AUSvsIND : पिंक बॉल सामन्यासाठी विराट सेनेची घोषणा 

संघटनेच्या कार्यकारी परिषदेत क्रिकेट सुधार समितीने सुचवलेल्या नावांच्या शिफारशीवरून, तसेच त्याबाबतच्या नियमावरून चांगलाच वाद झाला होता. अध्यक्ष डॉ. विजय पाटील कार्यकारी परिषदेस उपस्थित नसल्याने ही निवड आजपर्यंत (ता. 16) पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले होते. क्रिकेट सुधार समितीने आम्हाला निवड समितींची नावे दिली आहेत. ती आम्ही जाहीर केली आहेत. प्रशिक्षकांचे नाव उद्या सकाळी कळवले जाणार आहे. त्याची घोषणा लगेच करण्यात येईल, असे नाईक यांनी सांगितले. 

AUSvsIND : जाणून घ्या कोणते नवे रेकॉर्डस् होऊ शकतात उद्याच्या सामन्यात 

सुलक्षण कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस समितीने केली असल्याची मुंबई क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. कुलकर्णी यांनी अद्याप संघटनेने आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे कळवले आहे. संघटनेचे सचिव नाईक यांनी समितीने दोन नावे सुचवली आहेत. त्यापैकी एक नाव उद्या (ता. 17) कळवणार असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांच्याऐवजी जतीन परांजपे किंवा ऍबी कुरुविला मार्गदर्शक होण्याची चर्चा सुरू आहे. 

अंकोला निवड समितीचे अध्यक्ष 
माजी कसोटीपटू सलील अंकोला यांची निवड समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीत संजय पाटील, रवींद्र ठाकर, झुल्फीकार परकार, रवी कुलकर्णी यांचा समावेश आहे. एकमेव कसोटी खेळलेले अंकोला यांची 1996 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड झाली होती. अभिनयात कारकीर्द करण्यासाठी अंकोला यांनी 28 व्या वर्षीच निवृत्ती घेतली होती.


​ ​

संबंधित बातम्या