NZvsPAK 1st Test : किवींनी काढला पाक संघाचा जीव, विजयी सलामीसह घेतली आघाडी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात फवाद आलमने शतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने अर्धशतक साजरे केले.  न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात  टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, कायल जॅमिसन आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या पदरी निराशा आली. माउंट मैंगनुई येथील बे ओवलच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने अनिर्णित ठरेल असा वाटत असलेल्या सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानचा दुसरा डाव 271 धावांत आटोपला. शेवटच्या दिवसांपर्यंत रंगलेल्या कसोटी सामना अनिर्णित राहिल असे वाटत होते. मिशेल सँटनरने नसीम शाहाची विकेट घेत न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले.  नसीम शाह आणि शाहीन अफरीदीने मॅच ड्रॉच्या दिशेने आणली होती. मात्र ही जोडी फुटली आणि पाकिस्तानचा गेम प्लॅन फसला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या केन विलियमसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.  

पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात फवाद आलमने शतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने अर्धशतक साजरे केले.  न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात  टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, कायल जॅमिसन आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने  431 धावा केल्या होत्या. यात विलियमसनच्या 129 धावांची खेळी आणि  बीजे वाटलिंगच्या 73 धावांच्या खेळीचा समावेश होता. शाहीन अफरीदीने पहल्या डावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. यासिर शाहने आपल्या खात्यात  3 विकेटची भर घातली.  

AUSvsIND 3rd Test : टीम इंडिया सावधान! वॉर्नर कमबॅक करतोय

न्यूझीलंडने दिलेल्या पहिल्या डावातील धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 239 धावांत आटोपला.  मोहम्मद रिझवानने 71 आणि फहीम अशरफने 91 धावांची खेळी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 5 बाद 180 धावांवर डाव घोषीत केला. या डावात टॉम लाथमने 53 आणि टॉम ब्लंडेलने 64 धावांचे योगदान दिले. विजयासाठी 372 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने अवघ्या 75 धावांत 4 विकेट्स गमावल्या होत्या.

मोहम्मद रिझवान आणि फवाद आलम यांनी डाव सावरला. ही जोडी सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवेल असे वाटत असताना किवी गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव आटोपण्यात यश मिळवले. पाकिस्तानचा दुसरा डाव 271 धावांत आटोपला. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला नमवले तर ते आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानावर विराजमान होती. आयसीसीने ट्विटरच्या माध्यमातूनच ही माहिती दिली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या