मॅच न्यूझीलंड बांगलादेशची अन् चर्चा रंगली सुर्याच्या वादग्रस्त कॅचची (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीनम
Tuesday, 23 March 2021

. थर्ड अंपायरने अनेक अँगलने रिप्लाय पाहून कॅच ड्रॉप झाल्याचा निर्णय देत तमीम इक्बालला नाबाद ठरवले.

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काइले जेमीसनने घेतलेल्या कॅचमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेत डेविड मलानने सुर्यकुमार यादवचा झेल टिपला होता. या कॅचप्रमाणेच जेमीसनचा कॅचही वादग्रस्त ठरताना दिसतोय. काइल जेमीसनच्या कॅचनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. 

बांग्लादेशच्या डावातील 15 व्या षटकात कर्णधार तमीम इक्बाल 34 धावांवर खेळत होता. त्यावेळी जेमीसनने त्याचा झेल टिपला. कॅच झेलल्यानंतर खाली पडताना त्याचा हात जमीनाली टेकल्याचे रिप्लायमध्ये दिसून आले.  फील्ड अंपायरने तमीमला आउट दिले. त्यानंतर तमीम इक्बालने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने अनेक अँगलने रिप्लाय पाहून कॅच ड्रॉप झाल्याचा निर्णय देत तमीम इक्बालला नाबाद ठरवले.

सूर्यकुमारचा झेलही अशाच प्रकारचा होता. मात्र यावेळी सूर्याला विकेट गमवावी लागली होती. तमीम इक्बालला नॉट आउट दिल्यानंतर सुर्याला आउट कसे दिले? अशी चर्चा पुन्हा रंगल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंड बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णयाचे कौतुक होत असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

आयसीसीचा खेळात दुजाभाव दिसून येतो, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देखील या निर्णयानंतर उमटत आहेत. एका नेटकऱ्याने भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्यातील वादग्रस्त झेल टिपल्याचे फोटो शेअर करत जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या