चौथ्या दिवशीच विंडीजचा खेळ खल्लास; न्यूझीलंडनं हॅमिल्टनचं मैदान मारलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

वेस्ट इंडीजच्या संघाचा दुसरा डाव 247 धावांत आटोपत न्यूझीलंडने त्यांना एक डाव आणि 134 धावांनी पराभूत केले. 

New Zealand vs West Indies, 1st Test : कर्णधार केन विल्यमसनच्या अडीच शतकाच्या जोरावर धावांचा डोंगर उभा करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही कमाल केली. त्यामुळे पाच दिवसांचा कसोटी सामना न्यूझीलंडने चौथ्या दिवशीच जिंकला.  फॉलोऑननंतरही वेस्ट इंडीजची घसरगुंडी कायम राहिली. वेस्ट इंडीजच्या संघाचा दुसरा डाव 247 धावांत आटोपत न्यूझीलंडने विंडीजला एक डाव आणि 134 धावांनी पराभूत करत हॅमिल्टनच मैदान मारले.  

Record : 3 सामन्यांची T20 मालिका विराटने कधीच गमावलेली नाही​

न्यूझीलंडने  पहिला डाव  7 बाद 519 धावांवर घोषित केल्यावर वेस्ट इंडीजचा पहिला डाव 138 धावांतच गुंडाळला. फॉलोऑन दिल्यानंतर वेस्ट इंडीजची दुसऱ्या डावात 6 बाद 196 अशी अवस्था झाली होती. जेर्मी ब्लॅकवूड 80 आणि गोलंदाज असलेला अल्झारी जोसेफ 59 यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 107 धावांची भागीदारी केली.  तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विंडीजचा संघ 185 धावांनी पिछाडीवर होता. चौथ्या दिवशी अवघ्या 62 धाावांत विंडीजने 4 गडी गमावले. 

रवींद्र जडेजाची उणीव कोण भरणार? फलंदाजाकडून अपेक्षा

फॉलोऑननंतरही विंडीजची दाणादाण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उडवली. कर्णधार जेसन होल्डरसह त्यांचे सहा फलंदाज 89 धावांत बाद झाले. ब्लॅकवूड आणि जोसेफ यांच्या नाबाद भागीदारीने  संकट पुढे ढकलले गेले. पण अखेर न्यूझीलंडने ही जोडी फोडत चौथ्या दिवशीच सामना जिंकला. विंडीजच्या दुसऱ्या डावात नील वँगनरने सर्वाधिक 4 गड्यांना बाद केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या