आयपीएलमध्ये 'गुजरातची' एंट्री निश्‍चित 

शैलेश नागवेकर
Friday, 4 December 2020

बीसीसीआयची वार्षिक सभा; आणखी एका संघाची निवड होणार? 

नवी दिल्ली : आयपीएल आता आठऐवजी दहा संघांची होणार आणि दोन वाढीव संघात गुजरातचे स्थान निश्‍चित असणार, यावर बीसीसीआयच्या 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होण्याचे बाकी आहे. दहावा संघ कोणत्या शहराचा असेल याची उत्सुकता वाढली आहे. 

AUSvsIND : मालिका विजयानंतर देखील ब्रेट लीने व्यक्त केली नाराजी  

24 तारखेच्या वार्षिक सभेसाठी 21 दिवसांची नोटीस सर्व संलग्न संघटनांना पाठवण्यात आली आहे, त्यात 23 मुद्देही नमूद करण्यात आले आहे. अमिरातीतील आयपीएलचे सूप वाजत असताना दोन नव्या संघांची चर्चा जोरात सुरू झाली होती. ही शक्‍यता आता प्रत्यक्षात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

अदानी उद्योग समूह आणि आरपीजी यांचे प्रमुख संजीव गोयंका (रायझिंग पुणे सुपरजायंएटस्‌) यांनी दोन नवे संघ घेण्याची उत्सुकता दाखवली आहे. यातील अदानी अहमदाबाद संघाची फ्रॅंचाईसी घेणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

जय शहा यांना 'बढती'? 
एशियन क्रिकेट परिषद आणि आयसीसीच्या बैठकांना उपस्थित राहाण्यासाठी बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून विद्यमान सचिव जय शहा यांची नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे. 

वार्षिक सर्वसाधारण सभेतील चर्चेच्या इतर मुद्यांमध्ये निवड समितीत रिक्त झालेल्या तीन जागांसाठी नव्या सदस्यांची निवड, नवी तांत्रिक समिती तसेच पंच समिती आणि इतर उपसमित्याही स्थापन केल्या जाणार आहेत. 

आयपीएलचा पूर्ण लिलाव निश्‍चित 
आयपीएलमध्ये दोन नवे संघ तयार करण्यात आले तर सर्व खेळाडूंचा नव्याने लिलाव करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मात्र प्रत्येक संघ किती खेळाडूंना कायम ठेऊ शकतील हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या