धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

धोनी आपल्या ताकदीच्या जोरावर जो स्ट्रोक खेळायचा त्याला हेलिकॉप्टर शॉट म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर आता पंतचा स्ट्रोक फेमस होताना पाहायला मिळत आहे.

भारतीय संघाचा महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट चांगलाच चर्चेत राहिला आहे. क्रिकेटच्या डिक्शनरीपलीकडे जाऊन अविश्वसनीय फटका शोधून काढत धोनीने एक वलय निर्माण केले होते. यॉर्कर चेंडूवरही धोनी आपल्या ताकदीच्या जोरावर जो स्ट्रोक खेळायचा त्याला हेलिकॉप्टर शॉट म्हणून ओळख मिळाली. त्याच्यानंतर आता रिषभ पंतचा 'स्कूप शॉट' फेमस होताना दिसतोय. पुण्याच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक मॅच सुरु असताना न्यूझीलंडच्या गड्याने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या शॉटमुळे रिषभ पंत चर्चेत आला आहे. 

न्यूझीलंडचा फलंदाज ड्वेन कॉन्वे याने बांगलादेश विरुद्धच्या टी-20 मालिकेत मुस्ताफिझुर रहमानच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कूप शॉट खेळला. थर्ड मॅनच्या डोक्यावरुन मारलेल्या फटक्यावर त्याला सहा धावा मिळाल्या. कॉन्वेनं 52 चेंडूत 92 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशला 66 धावांनी पराभूत केले. कॉन्वे याने खेळलेल्या फटका हा रिषभ पंतच्या फटक्याची सेम टू सेम कार्बन कॉपी होती. 

IND vs ENG: विराटच्या नावे खास विक्रम, कॅप्टन कूल धोनी अजूनही उजवाच

A batting masterclass from yep you guessed it Devon Conway, has lead the @BLACKCAPS to a mammoth total of 210/3.

Catch the chase, wherever you are, on Spark Sport #NZvBAN pic.twitter.com/BkEybtocPk

— Spark Sport (@sparknzsport) March 28, 2021

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतने कसोटी सामन्यात जेम्स अँड्रसनला आणि टी-20 मालिकेत जोफ्रा आर्चरला असाच फटका लगावला होता. त्यामुळे साता समुद्रापलिकडे रिषभ पंतचा शॉट फेमस झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. हॅमिल्टनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 210 धावा केल्या होत्या. यात कॉन्वेच्या व्यतिरिक्त विल यंग याने 30 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना  बांगलादेशचा संघ 144 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

29 वर्षीय ड्वेन कॉन्वे याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केले होते. त्याने 11 सामन्यात 52.28 ची सरासरी आणि 145.2 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत त्याने 48 च्या सरासरीने धावा केल्या होतत्या.  


​ ​

संबंधित बातम्या