पाक-न्यूझीलंड लढतीनंतर रंगली गुरु-शनीची चर्चा! फोटो व्होतोय व्हायरल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

तो प्रसंग सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. गुरु आणि शनी या दोन ग्रह सर्वात जवळ आल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला यजमान संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 9 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. सेडन पार्कवर झालेल्या या सामन्यात खेळाडूंपेक्षा अधिक चर्चा रंगली ते मॅच दरम्यान कैद झालेल्या एका क्षणचित्राची. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमावल्यामुळे पाहुण्या पाकिस्तानने टी-20 मालिका गमावली आहे. 

सेडन पार्कवर झालेल्या दुसऱ्या सामन्यावेळी अवकाशात दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले.स ज्यावेळी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा किवींच्या डावीतील 12 व्या षटकात मॅचवर खिळलेला कॅमेरा अवकाशाच्या दिशेन वळला आणि मॅच पाहत असलेल्या क्रिकेट चाहत्यांना अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला.  

''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू घ्यावा''

तो प्रसंग सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. गुरु आणि शनी या दोन ग्रह सर्वात जवळ आल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. या दोन ग्रहातील अंतर जवळपास 400 वर्षांनी इतक कमी झाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी 1623 मध्ये दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट 60 वर्षांनंतर 15 मार्च 2080 रोजी ते पुन्हा इतके जवळ येणार आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या