विराटप्रमाणेच केननंही घेतली पॅटर्निटी लिव्ह, दुसऱ्या कसोटीला मुकणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 10 December 2020

केन विलियमसनच्या दमदार द्विशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात दमदार विजय नोंदवला होता. न्यूझीलंडने विंडीजला एक डाव आणि 134 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात विलियमसनने 251 धावांची खेळी केली होती.  

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसही पॅटर्निटी लिव्हवर गेला आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडीज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. विंडीज-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 11 डिसेंबरपासून वॅलिंग्टनच्या मैदानात रंगणार आहे. कीवी कोच गॅरी स्टीड यांनी केन विलियमनस घरी परतल्याची माहिती गुरुवारी दिली. विलियमसनची पत्नी प्रेग्नेंट असून तिच्यासोबत वेळ घालवता यावा यासाठी त्याची पॅटर्नटी लिव्ह मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

केन विलियमसनच्या दमदार द्विशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात दमदार विजय नोंदवला होता. न्यूझीलंडने विंडीजला एक डाव आणि 134 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात विलियमसनने 251 धावांची खेळी केली होती.  पत्नीच्या मेडिकल अपॉइंटमेंटचा दाखला देत तो घरी परतल्यापासून तो दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही यासंदर्भात चर्चा रंगली होती.

न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी दुसऱ्या सामन्यासाठी केन संघासोबत असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांनी तो घरी परतल्याचे स्पष्ट केले आहे.  स्टीड म्हणाले की, 'केनने दुसऱ्या कसोटीतून आपले नाव मागे घेतले असून तो घरी परतला आहे. त्याचा हा निर्णय त्याची पत्नी सारा आणि त्याच्यासाठी योग्य आहे. तो एकमेव खेळाडू नाही जो आपल्या मुलाच्या जन्मासाठी कसोटी सामन्याला मुकणार आहे, असा उल्लेखही न्यूझीलंड प्रशिक्षकांनी केलाय.  


​ ​

संबंधित बातम्या