NZvsPAK : पाकचा करामती कॅप्टन! न्यूझीलंडला खेळायला गेलाय की नाचायला?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

प्रतिस्पर्धी संघातील टॉम लॅथम शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता. त्याच्या  जवळ जाऊन मोहम्मद रिझवानने  डान्स करत वॉर्म-अपचा अजब-गजब नमुना पेश केला. त्याच्या या कृतीने समालोचकासह टॉम लॅथम आणि न्यूझीलंड विकेटकिपरसह अन्य खेळाडूंचे क्षणभरासाठी चांगलेच मनोरंजन झाले. 

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 101 धावांनी गमावला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानने दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात त्याने 71 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात 60 धावांचे योगदान दिले. त्याची ही खेळी संघाला यश मिळवून देऊ शकली नाही. त्याच्या या खेळी पेक्षा मैदानात त्याने केलेली नोटंकी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पहिल्या सामन्यात 28 वर्षीय विकेट किपर फलंदाज असलेल्या पाक कर्णधाराने हटके स्टाईलमध्ये वॉर्म-अप केल्याचे पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघातील टॉम लॅथम शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता. त्याच्या  जवळ जाऊन मोहम्मद रिझवानने  डान्स करत वॉर्म-अपचा अजब-गजब नमुना पेश केला. त्याच्या या कृतीने समालोचकासह टॉम लॅथम आणि न्यूझीलंड विकेटकिपरसह अन्य खेळाडूंचे क्षणभरासाठी चांगलेच मनोरंजन झाले. 

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 431 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा पहिला डाव 239 धावांतच आटोपला. फहिम अश्रफने 91 धावांची खेळी केली. त्याच्यासह कर्णधार मोहम्मद रिझवानने अर्धशतकी खेळी केली. या दोघांशिवाय एकाही पाकिस्तानी फलंदाजाचा किवींच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. दुसऱ्या डावातही रिझवानने कर्णधाराला साजेसा खेळ दाखवला.  

फवाद आलमने तब्बल 11 वर्षानंतर कसोटी शतक झळकावत दिलेल्या योगदानाशिवाय अन्य फलंदाज दुसऱ्या डावातही फेल ठरले. परिणामी पाकिस्तानवर सामना गमावण्याची वेळ आली. पाचव्या दिवशी 4.3 षटकांचा खेळ बाकी असताना पाकचा शेवटचा गडी बाद झाला. 27 बॉल खेळून काढत सामना अनिर्णित ठेवणे पाकला जमलं नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या