अन् 'MS धोनी द अनटोल्ड स्टोरी'तला किस्सा केनसोबत प्रत्यक्षात घडला (VIDOE)
सामना झाल्यानंतर केन विलियमसन पत्रकार परिषदेत बोलत होता. त्याचवेळी न्यूझीलंडचा विकेट किपर फलंदाज बीजे वॉटलिंगची त्याठिकाणी एन्ट्री झाली.
NZvsPAK : न्यूझीलंडने घरच्या मैदानात दमदार खेळ दाखवत पाकिस्तानी संघाचा फज्जा उडवला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी विजय नोंदवत न्यूझीलंडने मालिका 2-0 अशी खिशात घातली. या सामन्यात कर्णधार केन विलियमसन भलत्याच फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या सामन्यातील शतकी खेळीनंतर डबल धम्माका करणाऱ्या केन विलियमसनला मालिकावीराचा पुरस्काही मिळाला. त्याच्या खेळी प्रमाणेच त्याने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी कायपणची झलक दाखवून दिली.
सामना झाल्यानंतर केन विलियमसन पत्रकार परिषदेत बोलत होता. त्याचवेळी न्यूझीलंडचा विकेट किपर फलंदाज बीजे वॉटलिंगची त्याठिकाणी एन्ट्री झाली. पत्रकार परिषदेतच त्याने टेस्ट टी शर्टवर आपल्या कर्णधाराची ऑटोग्राफ मागितली. वॉटलिंगचे कृत्य पाहून कर्णधारही थोडा आवाक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
AusvsInd : सिडनीच्या मैदानात आतापर्यंत कोण ठरलंय भारी; जाणून घ्या रेकॉर्ड
पण त्याने त्याला परत न पाठवता ऑटोग्राफ देऊन टाकली. कदाचित फॅन्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी वॉटलिंगने भर पत्रकार परिषदेत कर्णधाराला डिस्टर्ब केलं. केन विलियमसनने त्याला दिलेली दाद ही कौतुकास्पदच होती. त्यामुळेच क्रिकेट प्रेमींना केनबद्दल असलेला आदर आणखी वाढला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात जोरदार चर्चाही रंगताना दिसते. आयसीसीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
''बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला विजयाची मोठी संधी''
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात असाच एक सीन चित्रित झाल्याचे पाहायला मिळाले होते. एमएस धोनीची भूमिका चित्रित करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतकडे चित्रपटातील अभिनेत्री दिशा पाटणीने सचिन तेंडुलकरची ऑटोग्राफची मागणी केल्याचे दाखवण्यात आले होते. धोनीची भूमिका साकरणाऱ्या सुशांतने पाजी...म्हणत सही देखील घेतल्याचे चित्रपटात पाहायला मिळाले होते. या सीनची आठवण आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओतून होते.