1258 दिवसानंतर कोहलीचं राज्य खालसा; बाबर ठरला टॉपर

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 14 April 2021

त्याच्या पाठोपाठ विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. मर्यादित षटकातील भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.  

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे क्रिकेटमध्ये नंबर वनचा फलंदाज बनला आहे. 26 वर्षीय बाबरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वलस्थान मिळवले आहे. मागील 1228 दिवसांपासून कोहली वनडे रँकिंगमध्ये टॉपल होता. त्याची जागा आता बाबर आझमने घेतलीये. दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने दमदार कामगिरी केली होती. कर्णधाराला साजेसा खेळ करत त्याने संघाला मालिका विजयम मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याचा त्याला वनडे रँकिंगमध्य फायदा झाला. आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या रँकिंगमध्ये  865 गुणासह तो अव्वलस्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. मर्यादित षटकातील भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.  

बाबरच्या नावे खास विक्रम 

आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वस्थान पटकवणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी जहिर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89) आणि मोहम्मद यूसुफ यांनी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले होते.  2010 आणि 2012 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा बाबर आझम 2015 पासून पाकिस्तानी संघातील नियमित सदस्य असून सध्याच्या घडीला तो संघाचे नेतृत्वही करत आहे.  

बॉल कुठं आणि पळतोय कुठं बघा ; पाकच्या गड्याची फजिती (VIDEO)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेपूर्वी बाबर आझमच्या खात्यात  837 गुण होते. पहिल्या सामन्यात त्याने 103 धावांची खेळी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात त्याने 94 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.  

टॉप-20 मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश 

न्यूजीलंडचा रोस टेलर चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच पाचव्या तर जॉनी बेयरस्टो, फाफ ड्युप्लेसीनंतर फखर झमान सातव्या स्थानावर पोहचलाय. त्याने पाच स्थानांनी सुधारणा केलीय. डेविड वॉर्नर आणि शाय होपही अव्वल दहामध्ये आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन 17 व्या स्थानाव आहे. 


​ ​

संबंधित बातम्या