कॅप्टन बाबरच्या दुखण्यामुळं पाक संघाला मोठा धक्का

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

पाकिस्तानमधील एका महिलने त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे त्याच्या अडचणी वाढत असताना त्याला दुखापत झाल्याची बातमी आली आहे. नेमका तो दुखापतग्रस्त आहे की याप्रकरणाचा काही संबंध आहे? अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगू शकते. 

Babar Azam Ruled Out Of T20 Series: न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) ने दुखापतीमुळं मालिकेतून माघार घेतली आहे. रविवारी सराव सत्रात आझमच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. 12 दिवस त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागणार आहे. 

18 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार थ्रो डाऊनवेळी तो दुखापतग्रस्त झाला असून त्याला क्वींसटाउनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो मडिकल टीमच्या निरीक्षणाखाली असून फिट असेल तरच त्याला कसोटी मालिकेसाठी खेळता येईल.  पाकिस्तानचा संघ 26 डिसेंबरपासून  न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.  

लेकीविषयी पसरलेल्या अफवांमुळं आफ्रिदी भडकला!

बाबर आझम हा केवळ संघाचा कर्णधार नाही तर आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्याची दुखापत पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते.  बाबर आझमच्या अनुपस्थितीची पाक संघाला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिस्बाह उल हक यांनीही मान्य केलं आहे. 

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या हत्येचा कट? पाक क्रिकेटर अडचणीत

दुखापत आणि खेळाच्या मैदानातील कामगिरीशिवाय बाबर आझम आणखी एका कारणास्तव चर्चेत आहे. पाकिस्तानमधील एका महिलने त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे त्याच्या अडचणी वाढत असताना त्याला दुखापत झाल्याची बातमी आली आहे. नेमका तो दुखापतग्रस्त आहे की याप्रकरणाचा काही संबंध आहे? अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगू शकते. 


​ ​

संबंधित बातम्या