न्यूझीलंडमधील कोरोनाबाधित क्रिकेटपटूंबाबत पाक मंडळाकडून चौकशी
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
लाहोर : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याची चौकशी करण्याचा पाक क्रिकेट मंडळाने घेतला आहे. दौऱ्यावर गेलेल्या संघातील काही खेळाडूंनी कायदे ए आझम स्पर्धेत खेळत असताना आपल्याला सर्दी, ताप तसेच खोकल्याचा त्रास असल्याची तक्रार केली होती.
AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...
त्यांची पाकिस्तानातील कोरोना निगेटिव आली होती, याकडे पाक मंडळाचे पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. पाकमधील स्पर्धेत खेळत असताना ताप आला होता, असे सांगणारे खेळाडू न्यूझीलंडमधील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित खेळाडू प्रामुख्याने कायदे ए आझम स्पर्धेतील दोन संघात होते. त्याहीपेक्षा पाकिस्तान सुपर लीगमधील एकाच संघातील आहेत, असेही सांगितले जात आहेत. ही लीग खेळलेला सोहेल तनवीर श्रीलंका लीगसाठी गेल्यावर पॉझिटिव्ह ठरला.
AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम
पाक संघ न्यूझीलंड दौऱ्यास रवाना होण्यापूर्वी दोन दिवस सलामीवीर फखऱ झमन याला ताप आला होता, तसेच त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यामुळे तो दौऱ्यावर गेला नव्हता.