बाळ तू जग बघितलं नव्हतंस तेव्हा मी सेंच्युरी मारलीय; आफ्रिदीने नवोदित बॉलरचे टोचले कान

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Tuesday, 1 December 2020

आफ्रिदीने प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंशी हातमिळवणी केली. त्यानंतर आफ्रिदीने नवोदित गोलंदाजाचे कान टोचल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पाकच्या दिग्गज अष्टपैलूने अफगान गोलंदाजाला म्हणाला की, बाळ तू जन्माला आला नव्हतास तेव्हापासून मी सेंच्युरी ठोकत आहेत. 

Shahid Afridi argues Naveen-ul-Haq: आयपीएलच्या यशस्वी हंगामानंतर श्रीलंकेत याच धर्तीवर लंका प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. जगभरतील दिग्गज खेळाडूंसह पाकिस्तानचे क्रिकेटरही या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत. सोमवारी कँडी टस्कर्स आणि गॉल ग्लेडिएटर यांच्यातील सामन्यात दोन्ही खेळाडूतील चांगलीच खुन्नस पाहायला मिळाली. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटर शाहिद आफ्रिदी अफगाणिस्तानच्या युवा क्रिकेटवर भडकल्याचे पाहायला मिळाले.  कँडी टस्कर्सने गॉल ग्लेडिएटरला पराभूत करत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.  टस्कर्सचा जलदगती गोलंदाज नवीन-उल-हक, ग्लेडिएटरच्या मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आलाय. 

सामन्यातील 18 व्या षटकात नवीनच्या चौथ्या चेंडूवर आमीरने चौकार खेचला. नवीने त्यानंतरचा चेंडू निर्धाव फेकला. आणि त्यानंतर मैदानात या दोन्ही गड्यांत संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात शाब्दिक चकमक झाली. हा वाद इथेच थांबला नाही. नवीनच्या अखेरच्या षटकातही गरमागरमी पाहायला मिळाली. त्यानंतर ग्लेडिएटरचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने नवीनसोबत चर्चा केली. आफ्रिदीने प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंशी हातमिळवणी केली. त्यानंतर आफ्रिदीने नवोदित गोलंदाजाचे कान टोचल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पाकच्या दिग्गज अष्टपैलूने अफगान गोलंदाजाला म्हणाला की, बाळ तू जन्माला आला नव्हतास तेव्हापासून मी सेंच्युरी ठोकत आहेत. 

लंका प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. टस्कर्स आणि ग्लेडिएटर यांच्यातील सामन्यात ब्रँडन मॅक्युलमच्या नाबाद 51 आणि कुशल मेडिसच्या 49 धावांच्या खेळीच्या जोरावर कँडी टस्कर्सने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 196 धावा केल्या होत्.या.  या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गॉल ग्लेडिएटरच्या संघाची सुरुवात खराब झाली. एका बाजूनं आघाडीचे फलंदाज तंबूत परतत असताना सलामीवीर दनुष्का गुणतिलकाने 53 चेंडूत  82 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. पण  ग्लेडिएटरला निर्धारित 20 षटकात 7 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारु शकला. शाहिद आफ्रिदीला या सामन्यात खातेही उघडता आले नाही.


​ ​

संबंधित बातम्या