सतराव्या वर्षी पदार्पण करणाऱ्या पार्थिवने अठरा वर्षानंतर जाहीर केली निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर फलंदाज पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर फलंदाज पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने वयाच्या 17 वर्षे आणि 153 दिवसांचा असताना भारताकडून पहिला सामना खेळला होता. आणि त्यासह भारताकडून खेळणारा सर्वांत युवा विकेटकीपर ठरला होता. पार्थिव पटेलने आज सोशल मीडियावरील ट्विटर वर पोस्ट करून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. 

विराट म्हणाला, अन्यथा हार्दिकचे स्थान कसोटी संघात नसणार

पार्थिव पटेलने 2002 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने भारताकडून 25 कसोटी, 38 एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने 31.1 च्या सरासरीने 934 धावा केलेल्या आहेत. व यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.7 च्या सरासरीने चार अर्धशतकांसह 736 धावा केलेल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गुजरातचे प्रतिनिधीत्व करताना 194 सामने खेळले आहेत.      

भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या आगमनानंतर पार्थिव पटेल संघात येण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. व  तो गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. तसेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत पार्थिव पटेल  विविध संघांकडून खेळला आहे. आणि यंदाच्या आयपीएल मध्ये तो बेंगळुरू संघाचा हिस्सा होता. टीम इंडियाकडून पार्थिव पटेलने अखेरचा सामना 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. पार्थिवला आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही शतक करता आलेले नाही. 

 


​ ​

संबंधित बातम्या