आमिरने सोडले क्रिकेट, पाक संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप
2017 मध्ये पाकिस्तान संघाला चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून देण्यात मोहम्मद आमिरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानने भारतीय संघाला रोखत मिनी वर्ल्डकप समजली जाणारी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती.
पाकिस्तानचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरने वयाच्या 28 व्या वर्षीच क्रिकेटमधून मोठा ब्रेक घेतलाय. सध्याच्या पाक संघ व्यवस्थापन संघात संधी देणार नाही. त्यामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने निवृत्ती घेतलीय की तो मोठ्या ब्रेकवर गेल्याय हा संभ्रम निर्माण झाला असताना आयसीसीने अधिकृत अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे.
मोहम्मद आमिरने निवृत्ती घेतल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केल्याचे ट्विट आयसीसीने केले आहे. त्यामुळे मोठ्या ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजाला पाकिस्तान बोर्डाने बाहेर काढले का? असा प्रश्न निश्चित चर्चेत येऊ शकतो.
2017 मध्ये पाकिस्तान संघाला चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून देण्यात मोहम्मद आमिरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानने भारतीय संघाला रोखत मिनी वर्ल्डकप समजली जाणारी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड दौऱ्यावर संघात निवड न झाल्याने तो नाराज होता. मोहम्मद आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी क्रिकेटपासून दूर जात नाही पाकिस्तान मॅनेजमेंटनेच माझ्या विरोधात कट आखला आहे, असे मोहम्म्द आमीरने म्हटले होते.
2010 ते 2015 दरम्यान संघ व्यवस्थापनाकडून खूप अवहेलना झाली. त्याने संघाचे माजी प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी कोच वकार युनिस यांच्यावरही हल्लाबोल केलाय. 2019 मध्ये मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून अचानकच निवृत्ती घेतली होती. दबावातून हा निर्णय घ्यावा लागला असेही आमिरने म्हटले होते.