पाकिस्तान क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये सरावबंदीच 

संजय घारपुरे
Friday, 4 December 2020

संघातील कोरोनाबाधित वाढण्याचा धोका 

ऑकलंड : पाकिस्तान क्रिकेट संघातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे संघाला सरावाची परवानगी देण्यात येणार नसल्याचे न्यूझीलंड आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या विजयाची कारणे

पाकिस्तान संघाचा दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी संघ विलगीकरणात राहील; पण न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर तीन दिवसांना गटागटाने सरावास मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले होते; मात्र पहिल्याच दिवशी पाक खेळाडूंनी विलगीकरणाचे नियम तोडले होते. त्याचबरोबर संघातील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांची सरावाची सुविधा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्‌वेंटी 20 मालिका 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

पाकिस्तान संघातील काही सदस्य कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापासून संघातील अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. या परिस्थितीत सरावाची परवानगी दिल्यास कोरोनाची साथ संघाबाहेरही पसरण्याचा धोका आहे. आम्ही सर्व विचार करूनच त्यांना पूर्णवेळ हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले आहे, असे न्यूझीलंडचे आरोग्य संचालक डॉ. ऍश्‍ले ब्लूमफिल्ड यांनी सांगितले. 

बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलची कमाल; वाचा नेमके काय घडले   

विलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकिस्तान संघाला न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर तीन दिवसांतच निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. न्यूझीलंडमध्ये येण्यापूर्वी पाक संघातील सर्व 53 सदस्यांची चार वेळा कोरोना चाचणी झाली होती. त्यात ते सर्व निगेटिव्ह होते, असे सांगण्यात आले होते.


​ ​

संबंधित बातम्या