प्रकाशझोतात होणार सराव सामना; कसोटी गवताळ खेळपट्टीवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

परदेशातील पहिली प्रकाशझोतातील कसोटी आठ दिवसांवर असताना भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून या कसोटीसाठी सराव सुरू करणार आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या या प्रकाशझोतातील तीन दिवसीय सामन्याद्वारे अतिरिक्त फिरकी गोलंदाज हवा की फलंदाज याचा निर्णयही अपेक्षित आहे.

सिडनी - परदेशातील पहिली प्रकाशझोतातील कसोटी आठ दिवसांवर असताना भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून या कसोटीसाठी सराव सुरू करणार आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या या प्रकाशझोतातील तीन दिवसीय सामन्याद्वारे अतिरिक्त फिरकी गोलंदाज हवा की फलंदाज याचा निर्णयही अपेक्षित आहे.

या लढतीचा प्रत्यक्ष कसोटीसाठी कितपत उपयोग होईल हाही प्रश्‍नच आहे. सराव सामना होणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असेल असे मानले जात आहे. त्याच वेळी ॲडलेड येथील पहिल्या कसोटीसाठी असलेल्या खेळपट्टीवर १० मिलिमीटर उंच गवत असेल असे संकेत माजी क्रिकेटपटू देत आहेत. दरम्यान, या सामन्यात मयांक अगरवालचा सलामीचा सहकारी म्हणून के एल राहुलचा विचार होण्याची शक्‍यता आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिलला राखीव खेळाडूतच ठेवण्याचा विचार आहे.

विराट कोहलीचा ब्रेक, कुलदीपची चाचणी
सराव सामना आहे, त्यामुळे त्यात अधूनमधून खेळणे मला आवडत नाही. फिझिओंबरोबर चर्चा करूनच खेळण्याबाबत ठरवणार आहे, असे विराट कोहलीने सांगितले. कोहलीचा ब्रेक निश्‍चित आहे. मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यापैकी एकाची निवड करणे सोपे होऊ शकेल. कुलदीप सीमचा हुशारीने उपयोग करतो. हे प्रकाशझोतातील कसोटीत प्रभावी ठरू शकेल हा विचार आहे.

Edited By - Prashant Patil


​ ​

संबंधित बातम्या