प्रसिद्ध कृष्णासह सैफर्टही बाधित

पीटीआय
Sunday, 9 May 2021

आयपीएल स्थगित करण्यात आली तरीही कोरोनाने खेळाडूंची पाठ अजून सोडलेली नाही. कोलकाता संघातील प्रसिद्ध कृष्णा आणि टीम सैफर्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. सैफर्ट हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे.

नवी दिल्ली - आयपीएल स्थगित करण्यात आली तरीही कोरोनाने खेळाडूंची पाठ अजून सोडलेली नाही. कोलकाता संघातील प्रसिद्ध कृष्णा आणि टीम सैफर्ट यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. सैफर्ट हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. 

इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय संघातील राखीव खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाची कालच निवड झाली होती. तो राखीव असला तरी संघाबरोबर लंडनला जाणार आहे, परंतु आता कोरोनाबाधित झाल्यामुळे त्याच्या प्रयाणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या तो बंगळूरमधील आपल्या घरी गृह विलगीकरणात आहे.

आयपीएलमध्ये खेळाडू कोरोनाबाधित होण्यास कोलकाता संघातून सुरुवात झाली. त्यांचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आणि तेथूनच चेन्नई संघाचे मार्गदर्शक दिल्ली संघातील दोन खेळाडू यांना बाधा झल्याचे स्पष्ट होताच आयपीएल स्थगित करण्यात आली, परंतु कोरोनाचे लोण कोलकाता संघात प्रसिद्ध कृष्णा आणि सैफर्ट यांना बाधा झाल्यामुळे कायम राहिले आहे. परिणामी कोलकाता संघातील इतर खेळाडू चिंतेत पडले आहेत.

सैफर्ट हा न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज समजला जातो, तो सध्या अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये अलगीकरणात आहे.


​ ​

संबंधित बातम्या