IPL आधी पृथ्वीचं तुफान, दिग्गजांना लाजवेल असा केला विक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 14 March 2021

८ सामन्यात ४ शतकांच्या बळावर ८२७ धावांचा पाऊस

नवी दिल्ली  : पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील मुंबई संघानं उत्तर प्रदेशचा सहा गडी ५१ चेंडू राखून पराभव करत विजय हजारे चषकावर नाव कोरलं आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात अदित्य तरेच्या दमदार शतकी खेळीला पृथ्वीच्या तुफानी अर्धशतकाचं मिळालेल्या बळावर मुंबईनं ३१३ धावांचं आव्हान यशस्वी पार केलं. २० फेब्रुवारीपासून देशांतर्गत क्रिकेटचा थरार सुरु होता. यामध्ये मुंबईनं आपलं वर्चस्व कायम राखत विजयी मिळवला आहे. पृथ्वी शॉ यानं विजय हजारे करंडकात आपल्या कामगिरीनं सर्वांचेचं लक्ष वेधून घेतलं आहे. खराब कामगिरीमुळे भारतीय संघाबाहेर राहिलेल्या पृथ्वीनं विजय हजारे चषकात धावांचा पाऊस पाडला आहे. 

अंतिम सामन्यात ३१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार पृथ्वी शॉ यानं मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत झटपट ७३ धावांची खेळी केली. उपांत्य सामन्यात जेथून फलंदाजी थांबवली होती तेथूनच त्यानं अंतिम सामन्यात सुरु केल्याचं वाटत होतं. फक्त ३९ चेंडूत ७३ धावांची विस्फोटक फलंदाजी केली. यशस्वी जयस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी १० षटकांत ८९ धावांची भागिदारी केली. पृत्वीनं आपल्या विस्फोटक फलंदाजीदरम्यान १० चौकार आणि चार षटकारांचा पाऊस पाडला.  मोठा फटका मारण्याच्या नादात पृथ्वी शिवम मावीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पृथ्वी शॉचं शतक हुकलं मात्र, त्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

विजय हजारे चषकात पृत्वी शॉच्या नावावर ८२७ धावांची नोंद झाली आहे. विजय हजारे चषकाच्या १८ वर्षांच्या इतिहासात या सर्वाधिक धावा आहेत. २००२ पासून आतापर्यंत एकाही फलंदाजाला ८०० धावांचा पल्ला पार करता आला नव्हता. मात्र, पृथ्वी शॉ यानं तुफानी फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. पृथ्वी शॉनं ८ सामन्यात ४ शतकांच्या बळावर ८२७ धावांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत पृथ्वी शॉ यानं २५ षटकार आणि १०५ चौकार लगावले आहेत.

Prithvi Shaw in Vijay Hazare 2021:

105*(89)
34(38)
227*(152)
36(30)
2(5)
185*(123) in Quarter-Final
165(122) in Semi-Final
73(39) in Final

827 runs from 8 matches innings including 1 double hundred, 3 hundreds and 1 fifty. What an incredible season for Mumbai Captain. pic.twitter.com/9CnMVNOCYW

— Johns. (@CricCrazyJohns) March 14, 2021

खराब फॉर्ममुळे संघाबाहेर राहिलेल्या पृथ्वी शॉ यानं आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. तसेच संघाबाहेर ठेवणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांनाही विचार करण्यास भाग पाडलं आहे. आयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ यानं केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्ली संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत कर्नाटकच्या देवदत्त पडिकल यानं सात सामन्यात ७३७ धावांचा पाऊस पाडला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या