राशीद खानच्या हेलीकॉप्टर शॉटवर इंग्लिश महिला क्रिकेटर झाली फिदा (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

राशीदच्या या स्ट्रोकवर इग्लिश क्रिकेटर चांगलीच खूश झाली आहे. तिने आपल्या ट्विटरवरुन राशीदच्या हेलीकॉप्टर शॉटचा व्हिडिओ शेअर केलाय.  

पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या सहाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर लाहोर क्लंदर्स संघाकडून मैदानात उतरलाय. राशीदच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने पेशावर जाल्मी संघाला पराभूत केले. या सामन्यात राशीद खानने  पहिल्यांदा गोलंदाजीवेळी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना नाचवले आणि नंतर आपल्या फलंदाजीतील धमाकेदार कामगिरीचा नजराणा पेश केला. आपल्या खेळीत त्याने धोनी स्टाइल षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. राशीदच्या या स्ट्रोकवर इग्लिश क्रिकेटर चांगलीच खूश झाली आहे. तिने आपल्या ट्विटरवरुन राशीदच्या हेलीकॉप्टर शॉटचा व्हिडिओ शेअर केलाय.  

Vijay Hazare Trophy 2021 : मुंबईची ‘शॉ’नदार विजयी सलामी

राशीदचा हेलीकॉप्टर सिक्सर शॉट पीएसएलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. हे ट्विट इंग्लडची स्टार महिला क्रिकेटर सारा टेलरने रिट्विट केले आहे. सो स्टाईलीश या कॅप्शनसह तिने ट्विट रिट्विट केले आहे. राशीद मलाही शिकव हा स्टोक कसा खेळायचा, असा उल्लेखही सारा टेलरने केला आहे. सोशल मीडियावर जेवढी राशीदच्या शॉटची चर्चा आहे तेवढीच चर्चा सारा टेलरने व्यक्त केलेल्या भावनेची होताना दिसते.  

नाणेफेक जिंकून लाहोरच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघातील गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. पेशावरच्या संघाला त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 बाद 140 धावात रोखले. धावांचा पाठलाग करताना  राशिद खानने  15 चेंडूत  3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. राशीद खानने हेलीकॉप्टर शॉट खेळत षटकाराने संघाला 4 गडी राखून जिंकून दिले. 


​ ​

संबंधित बातम्या