LookBack2020 : आयपीएल मध्ये यंदा राहिला मुंबई इंडियन्सचाच बोलबाला  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जला नमवत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चौथ्यांदा जेतेपदावर कब्जा केला. या दिमाखदार कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम त्यांना खुणावत होता. युएईच्या मैदानात त्यांनी चेन्नईच्या या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र यंदाचे मुंबई इंडियन्स संघाचे विजेतेपद हे नक्कीच विशेष होते.

क्रिकेट जगतातील व्यावसायिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग. आयपीएल म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा 2008 पासून दरवर्षी मार्च महिन्याच्या कालावधीत खेळवण्यात येते. आणि महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा चालू झाल्यापासून या स्पर्धेची लोकप्रियता वाढतच चालली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा या स्पर्धेवर काळे ढग दाटले होते. त्यामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलत सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने दमदार कामगिरी करत चषक उंचावला. 

AUSvsIND: वसीम जाफरचे कोड लँग्वेज मधील ट्विट होतंय जाम व्हायरल 

मुंबई इंडियन्स संघाने मैदानावरील त्यांच्या अविश्वसनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करण्यास देखील प्रवृत्त केले आहे. 2008 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरला होता. आणि पहिल्या हंगामात पाचव्या स्थानावर राहिलेल्या संघानेच युएईत रंगलेल्या स्पर्धेत पाचव्यांदा ट्रॉफी उंचावली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारत आयपीएलच्या कारकिर्दीत आतापर्यंत सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला. 

मुंबईच्या संघाचे नेतृत्व 2013 मध्ये रोहित शर्माच्या खांद्यावर आले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिली ट्रॉफी जिंकली. 2014 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा खेळ प्ले ऑफमध्येच थांबला. पण 2015 आणि 2017 ला त्यांनी पुन्हा रोहितच्या नेतृत्वाखाली बाजी मारली. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जला नमवत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चौथ्यांदा जेतेपदावर कब्जा केला. या दिमाखदार कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा विक्रम त्यांना खुणावत होता. युएईच्या मैदानात त्यांनी चेन्नईच्या या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र यंदाचे मुंबई इंडियन्स संघाचे विजेतेपद हे नक्कीच विशेष होते. कारण कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धाच परदेशात हलविण्यात आली व पहिल्यांदाच चाहत्यांच्या अनुपस्थित जैव सुरक्षित वातावरणात सर्व सामने खेळवण्यात आले. त्यामुळे सगळ्याच संघांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचावे लागले. 

आयपीएलच्या तेराव्या आवृत्तीत विजेतेपद राखण्यासोबतच मुंबई इंडियन्सने डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रथम स्थान मिळवण्याचा विक्रम केला. मुंबईच्या संघाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर, तिच्या तीनही सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर 317 दशलक्षहून जास्त चाहत्यांपर्यंत पोहचण्याचा कारनामा यावर्षी केला.   

AUSvsIND : बॉक्सिंग डे सामन्याच्यापूर्वी अजिंक्य रहाणेचे मोठे वक्तव्य

आयपीएलच्या तेराव्या आवृत्तीत मुंबईच्या संघाने चौदा पैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवून 18 अंकांसह प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवला होता. व त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्याच क्वालिफायर सामन्यात नमवत मुंबई इंडियन्सच्या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला होता. याशिवाय पुन्हा आयपीएलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत मुंबईची इंडियन्स लढत झाली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 157 धावांचे लक्ष्य मुंबईला दिले होते. व हे लक्ष्य मुंबईच्या संघाने कर्णधार रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकामुळे सहजरित्या पार केले होते.   


​ ​

संबंधित बातम्या