इंग्लंडचा खेळ खल्लास; लारा वर्सेस सचिनच्या संघात रंगणार सेमीफायनल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 17 March 2021

इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. पण..

Road Safety World Series T20 2020-21 : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-20 स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडच्या दिग्गजांना धुळ चारत सेमीफायनलचे तिकीट मिळवले. इंग्लंड लिजेंड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 बाद 186 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य वेस्ट इंडिज संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला 5 धावांची गरज असताना लारा स्ट्राइकवर होता. ट्रेंडवेलने पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि सामन्यातील रंगत आणखी वाढली. पाच चेंडूत पाच धावा अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लाराने दोन धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूवर बाइजच्या रुपात विंडीजला एक धाव मिळाली. तीन चेंडूत दोन धावांची गरज असताना डिओनरेनने एक धाव काढली. विजय धाव घेण्याची लाराकडे संधी असताना लारा आउट झाला आणि सामना एका चेंडूत एक धाव अशा रंगतदार परिस्थितीत पोहचला. सामना सुपर ओव्हर्समध्ये जाणार अशी शक्यता वाटत असताना बेस्टने एकेरी धाव घेऊन संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह विंडीजच्या संघाने सेमीफायनल गाठली  लाराच्या नेतृत्वाखालील संघासमोर सेमीफायलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्स संघाचे आव्हान असणार आहे. 

INDvsENG : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारणे  

इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर मस्टर्ड आणि पीटरसन यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावा कुटल्या. ड्वेन स्मिथने इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने पीटरसनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. त्याने 24 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या. ड्वेन स्मिथनं पुन्हा मस्टर्डची शिकार केली. तो 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 57 धावा केल्या. 16 चेंडूत 22 धावा करणाऱ्या जे ट्रोटोनला बेनने माघारी धाडले. ओवैस शाहने 30 चेंडूत ठोकलेल्या  नाबाद 53 धावा आणि ट्रेलमेटच्या नाबाद 9 धावांच्या जोरावर इंग्लंड लिजेंड्स संघाने निर्धारित 20 षटकात 3 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली होती. 

धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीमध्ये दोन विकेट घेणाऱ्या ड्वेन स्मिथने सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. ट्रेवेलने त्याला तंबूत धाडले. त्यापूर्वी जोकोब्सने 13 धावा करुन तंबूचा रस्ता धरला होता. एन डिओनरेन याने 37 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी करत विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर एडवर्ड्सने 34 धावांची उपयुक्त खेळी केली. एका चेंडूत एक धावेची गरज असताना टिनो बेस्टने एक धाव घेतली. भारत भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या