रोहितची तंदुरुस्ती चाचणी आज होण्याची दाट शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

आघाडीचा फलंदाज रोहित शर्माची तंदुरुस्ती चाचणी उद्या होण्याची शक्‍यता आहे. बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ही चाचणी होईल. चाचणीत तंदुरुस्त ठरल्यास ऑस्ट्रेलिया प्रयाणाची पूर्वतयारी सुरू होईल असे समजते. आयपीएलदरम्यान रोहित शर्माच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यानंतर तो संघ मार्गदर्शक रवी शास्त्री आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची सूचना नाकारून आयपीएल लढतीत खेळला होता.

बंगळूर - आघाडीचा फलंदाज रोहित शर्माची तंदुरुस्ती चाचणी उद्या होण्याची शक्‍यता आहे. बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ही चाचणी होईल. चाचणीत तंदुरुस्त ठरल्यास ऑस्ट्रेलिया प्रयाणाची पूर्वतयारी सुरू होईल असे समजते.

आयपीएलदरम्यान रोहित शर्माच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यानंतर तो संघ मार्गदर्शक रवी शास्त्री आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची सूचना नाकारून आयपीएल लढतीत खेळला होता. त्यानंतर त्याच्या संघनिवडीवरूनही नाट्य झाले. त्यातच रोहित शर्मा थेट भारतात परतणार असल्याची कल्पना नव्हती, अशी टिप्पणी कर्णधार विराट कोहलीने केली होती.

रोहितची उद्या चाचणी करताना तो सामन्यासाठीही तंदुरुस्त आहे का याबाबतही निर्णय होईल. अर्थात रोहित लवकरात लवकर १२ डिसेंबरलाच ऑस्ट्रेलियास रवाना होऊ शकेल. त्यानंतर १४ दिवसांचे विलगीकरण संपल्यावर तो अखेरच्या दोन कसोटींसाठीच उपलब्ध होऊ शकेल. तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनीत होणार आहे. रोहित संघात हवा, असे अनेक क्रिकेट अभ्यासकांचे मत आहे. संघात आल्यास रोहित डावास सुरुवात करण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil


​ ​

संबंधित बातम्या