मास्टर ब्लास्टरनेच सांगितले कोण भारी; अजिंक्य की विराट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. तर ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे क्रिकेट जगतात आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची तुलना करण्यात येऊ लागली आहे. यावर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरनेच प्रतिक्रिया दिली आहे. 

सय्यद मुश्ताकअली टी20 : बीसीसीआयचा युवराज सिंगला ठेंगा

अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यातील कर्णधारपदाविषयी बोलताना, सचिन तेंडूलकरने या दोघांची तुलना करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सचिन तेंडुलकरने दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य रहाणेचे व्यक्तिमत्व आणि विराटचे व्यक्तिमत्व पूर्णपणे भिन्न असल्याचे सांगितले. तर हे दोघेही भारतीय आहेत. आणि भारतीय संघासाठी खेळत असल्यामुळे या दोघांच्यातील कोणीही त्याच्यावर नसल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. याशिवाय देश आणि संघ हा सगळ्यांपेक्षा वर असल्याचे सचिनने यावेळेस नमूद केले. 

तर यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन कसोटी सामने खेळले आहेत. आणि या तीनही सामन्यांमध्ये भारतीय संघाला हार मानावी लागली होती. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामन्यात भारतीय संघाने मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारली. तसेच अजिंक्य रहाणे यावर्षी कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून, यंदा त्याने कसोटीत भारतासाठी एकमेव शतकही झळकावले आहे. 

AUSvsIND : कांगारूंनो सावधान; हिटमॅनचे इंजिन सुरु झाले आहे 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान  खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.    


​ ​

संबंधित बातम्या