ही महिला ठरणार क्रिकेटच्या मैदानातील खरी वाघीण; पुरुषांना देणार ट्रेनिंग

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 16 March 2021

यापूर्वी आपण साराला  इंग्लंडच्या राष्ट्रीय महिला  संघाच्या विकेटमागे लक्षेवेधी कामगिरी बजावताना पाहिले आहे. ससेक्स क्लबसाठी ती विकेटमागची बाजू भक्कम करण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसेल.

इंग्लिश महिला खेळाडू क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे. पहिल्यांदाच पुरुष क्रिकेटर्सला एक महिला क्रिकेटर ट्रेनिंग देताना दिसेल. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट क्लब ससेक्सने इंग्लिश महिला क्रिकेटर कोचिंग स्टाफची सदस्य म्हणून काम करणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी हंगामात जी क्रिकेटर सारा टेलर नव्या जबाबदारीसह क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. तिच्यासोबतच  एशले राइटही स्टाफ सदस्य असेल, असेही ससेक्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या दोघी पूर्णवेळ मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळणार असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आलाय.  

यापूर्वी साराला आपण इंग्लंडच्या राष्ट्रीय महिला  संघाच्या विकेटमागे लक्षेवेधी कामगिरी बजावताना पाहिले आहे. ससेक्स क्लबसाठी ती विकेटमागची बाजू भक्कम करण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसेल. 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर प्रकृती अस्वस्थामुळे साराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता कोचिंगच्या रुपात ती नवी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झालीय.पुरुष क्रिकेटमध्ये अंपायरिंग स्टाफनंतर आता कोचिंग स्टाफमध्येही महिलांची एन्ट्री झाली आहे. याचा आनंद असल्याचे साराने म्हटले आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाचा एक महिला क्रिकेटर पुरुष संघाला मार्गदर्शन करणार आहे.  सारा टेलरने इंग्लंडसाठी 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 10 कसोटी, 126 वनडे आणि 90 टी20 सामन्यांचा समावेश आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये तिने 6 हजारपेक्षा अधिक धावा केल्या असून यात 7 शतकांचाही समावेश आहे. 2006 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.  

INDvsENG: टीम इंडियाला आता सातत्याची गरज; तिसऱ्या लढतीसाठी लाल माती असलेली खेळपट्टी

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये यष्टीमागील चपळाईने सर्वाधिक विकेट मिळवून देण्याचा विक्रम साराच्या नावे आहे. कसोटीत 18 , वनडेत 87 आणि टी 20 मध्ये तिने 23 कॅच घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या दोन स्टम्पिंग करणाऱ्या साराने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 51-51 जणींना तंबूचा रस्ता दाखवला आहे. क्रिकेटच्या मैदानातील आपल्या दिमाखदार खेळाने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आयसीसीने तब्बल तीन वेळा टी20 प्लेयर ऑफ द ईयर पुरस्काराने साराचा गौरुव केलाय. क्रिकेट जगतातील सर्वोत्तम विकेटकिपर म्हणून तिला ओळखले जात होते. आपल्या अंगी असलेल्या कौशल्यातून ती आता पुरुष क्रिकेटमध्ये योगदान देताना दिसेल. काही दिवसांपूर्वीच पुरुष क्रिकेटमध्ये अंपायरच्या भूमिकेत महिला मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता साराच्या रुपात पुरुष क्रिकेटमध्ये महिलेच्या खांद्यावर कोचिंगची जबाबदारी असणार आहे. ही इंग्लिश क्रिकेटमध्येच नाही तर जगभरातील सर्व महिला वर्गाला अभिमान वाटावा, अशीच गोष्ट आहे.


​ ​

संबंधित बातम्या