पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर कोच बेरोजगार होणार; अख्तरने केला मोठा खुलासा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने मिसबाह उल हक यांना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे, असे अख्तरने म्हटले आहे. अख्तरने यूट्यूब चॅनेलवर यासंदर्भातील खुलासा केलाय.

न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तानी संघाला दोन सामन्यांची कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्विकारावा लागला. पाकिस्तानी संघाच्या या पराभवाचे खापर आता संघाचे कोच मिसबाह उल हक यांच्यावर फो़डण्यात येत आहे. न्यूझीलंडमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने संघाच्या प्रमुख प्रशिक्षक असलेल्या मिसबाह उल हक यांची उचल बांगडी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी संघाचा माजी क्रिकेटर आणि जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही ही चर्चा खरी असल्याचे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने मिसबाह उल हक यांना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे, असे अख्तरने म्हटले आहे. अख्तरने यूट्यूब चॅनेलवर यासंदर्भातील खुलासा केलाय. अख्तर म्हणाला की, तुम्ही पाकिस्तानी संघाचा तमाशा पुन्हा एकदा पाहिला. त्यानंतर आता कोच बदलण्यात येणार असून अँडी फ्लॉवर यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचीही त्यांनी म्हटले आहे. अँडी फ्लॉवर त्याचा ताफा घेऊन येईल. त्यामुळे मिसबाहच्या जवळच्या लोकांनाही त्याच्यासोबत घरी जावे लागेल, असा टोलाही अख्तरने लगावला आहे. 

ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी

अख्तरने पीसीबीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जाणीवपूर्वक मिसबाह सारख्या सर्व सामान्य लोकांनाची निवड करते. त्यामुळे पाच सहा महिन्यानंतर संघाच्या पराभवाचे खापर त्यांना त्याच्यावर फोडता येते, असा काहीसा खेळ पाकिस्तानी बोर्डात सुरु असतो, असा आरोपही अख्तरने केलाय.  


​ ​

संबंधित बातम्या