म्हणे पाकिस्तानी क्रिकेटर स्मार्ट; पुराव्यासाठी अख्तरनं शेअर केला बाबरचा व्हिडिओ

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

शोएबने शेअर केलेल्या व्हिडिओतील पहिल्यांदा बाबर आझम आपल्या घरात क्रिकेट खेळताना दिसते.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने  (Shoaib Akhtar) पाकिस्तानी क्रिकेटर स्मार्ट असल्याचा दावा केलाय. यासाठी त्याने सोमवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे.  विराट कोहलीला मागे टाकून वनडेत अव्वल स्थान मिळवलेल्या बाब आझम (Babar Azam) चा व्हिडिओ शेअर करुन शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेटमधील टॅलेंट नेमकं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शोएबने शेअर केलेल्या व्हिडिओतील पहिल्यांदा बाबर आझम आपल्या घरात क्रिकेट खेळताना दिसते. बॅटच्या खाली टाकलेला चेंडू बाबर विकेट किपरच्या दिशेने चतुरपणे टोलवल्याचे पाहायला मिळते. 

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात बाबर आझम दक्षिण आफ्रिकेविद्धच्या सामन्यात खेळतानाचा क्षण दाखवण्यात आलाय. बाबर आझमने सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या टी-20 सामन्यात  59 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने एक जबरदस्त शॉट खेळला होता.  दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजाने यॉर्कर लेंथ टाकलेला बॉल बाबर चलाखीनं विकेटकिपरच्या जवळून बाउंड्रीच्या बाहेर मारताना दिसते. त्याचा हा शॉट बघताना खूप सोपा वाटत असला तरी फुल लेंथ यॉर्कवरील त्याने मिळवलेल्या चार धावा त्याच्यातील स्मार्टनेस आणि क्रिकेटची समज दाखवून देणारा असाच आहे. 

झिलची अविश्वसनीय कामगिरी; 26 वर्षानंतर भारताला मिळवून दिले गोल्ड​

गल्ली क्रिकेटमुळे पाकिस्तानी क्रिकेटर्स स्मार्ट 

एका खास कॅप्शनसह शोएब अख्तरने बाबर आझमचा व्हिडिओ शेअर केला आहे. गल्ली क्रिकेट खेळून पाकिस्तानी क्रिकेटर्समध्ये चतूर झाले आहेत. गल्लीमध्ये खेळताना जागा कमी असते. त्यामुळे खेळाडूंना अधिक चतुराईने खेळावे लागते. असा उल्लेखही अख्तरने केलाय. बाबर आझमने गल्ली क्रिकेटमधून शिकलेला शॉट दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात खेळून बाबर आझमने स्मार्टनेसपणा दाखवला, असेच शोएब अख्तरने म्हटले आहे.  

IPL 2021 : रसेलनं जाणूनबुजून धावबाद नाही केलं? पाहा Video

विराटला मागे टाकून वनडेत बाबरने गाठले अव्वलस्थान 

आयसीसीच्या नव्या वनडे क्रमवारीत बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराटची बादशाहत संपुष्टात आणत स्वत: अव्वलस्थानी पोहचला होता. जहीर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89) आणि मोहम्मद यूसुफ (2003) यांच्यानंतर वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचणारा बाबर चौथा पाकिस्तानी फलंदाज आहे.  


​ ​

संबंधित बातम्या