इंग्लंड क्रिकेट संघास सांकेतिक भाषेत सूचना 

संजय घारपुरे
Wednesday, 2 December 2020

इंग्लंड क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये नवा प्रयोग सुरू केला आहे.

जोहान्सबर्ग : इंग्लंड क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये नवा प्रयोग सुरू केला आहे. कर्णधार हा मैदानात निर्णय घेत असतो, हा संकेतास छेद देत संघाच्या विश्‍लेशकांनी कर्णधार इऑन मॉर्गनला सांकेतिक भाषेत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिका पराभवाची कारणे

इंग्लंड संघाचे विश्‍लेषक नॅथन लिमन यांनी आकडे आणि अक्षरांच्या मदतीने सांकेतिक भाषा तयार केली आहे. त्याची मदत घेऊन सामन्यातील परिस्थितीनुसार ते मॉर्गनला सूचना देतात, याची कबुली इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलर याने दिली आहे. या सांकेतिक भाषेतील फलक इंग्लंड संघाच्या बाल्कनीत ठेवण्यात येतात. त्याचा वापर करण्यासाठी सामनाधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. 

AUSvsIND : तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने रचला इतिहास  

आधुनिक क्रिकेटमध्ये सामन्यातील विश्‍लेषण महत्त्वाचे आहे असे बटलरने सांगितले. तर इंग्लंड क्रिकेट मंडळाने यास थेट खेळाडूंपुरती माहिती असे यास संबोधले आहे. त्याच वेळी कर्णधार मॉर्गन याचा उपयोग करू शकेल अथवा दुर्लक्ष करू शकेल असेही सांगितले. मॉर्गन नक्कीच सर्वोत्तम कर्णधार आहे. तो सहजपणे अचूक निर्णय घेतो. संघव्यवस्थापनाकडून आलेल्या माहितीचाही योग्य प्रकारे उपयोग करून घेण्याची गरज असते. झटपट अचूक निर्णय हे एक नक्कीच कौशल्य आहे, पण त्यास एका विश्‍लेषणाची साथ लाभली, तर निर्णय जास्त प्रभावी होतील, असे बटलर म्हणाला. 

क्रोनिए - वूल्मर सवांदासारखे... 
1999 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी दक्षिण आफ्रिका संघाचे मार्गदर्शक बॉब वूल्मर हे कर्णधार हॅन्सी क्रोनिएला इअरपिसद्वारे सूचना करीत होते. त्याच्याशी याच सांकेतिक भाषेची तुलना होत आहे, पण हे वूल्मर-क्रोनिए संवादासारखे नसल्याचा दावा मायकेल आथरटन यांनी केला.


​ ​

संबंधित बातम्या