पॅटर्निटी लिव्हबाबत दादा विराटच्या पाठीशी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांपैकी आज पहिला सामना अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांपैकी आज पहिला सामना अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला. या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली उर्वरित तीन सामन्यात न खेळता पुन्हा मायदेशी परतणार आहे. व त्यासाठी विराटने कोहलीने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) परवानगी घेतली होती. 

विराटचे 'सेंच्युरी पॅचअप' मुश्किलच!

विराटने कोहलीने पितृत्वाच्या रजेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांना मुकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे क्रिकेट जगतात याविषयी बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. त्यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या पितृत्वाच्या रजेला त्याची संपूर्णपणे वैयक्तिक गोष्ट असल्याचे म्हटले आहे.   

एका कार्यक्रमात सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या सुट्टीबाबाबत बोलताना, विराटला जे योग्य वाटले तो निर्णय त्याने घेतला असल्याचे सांगितले. शिवाय मंडळाने विराटने केलेल्या अर्जाचा विचार करूनच त्याची सुट्टी मंजूर करण्यात आली असल्याचे सौरव गांगुली यांनी यावेळेस स्पष्ट केले. तसेच जेव्हा बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे, तेव्हा याबद्दल अधिक सांगण्यासारखे काही नसल्याचे सौरव गांगुली म्हणाले. याव्यतिरिक्त अनेकांनी विराटच्या या रजेवर आक्षेप घेतलेला असला तरी, प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकतात, असे सौरव गांगुली यांनी पुढे म्हटले आहे.     

AUSvsIND 1st Test Day 1:अर्धशतक हुकलेल्या चेतेश्वर पुजाराच्या नावावर झाला अनोखा...

दरम्यान, यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी सुनील गावस्कर यांनी आपण पॅटर्निटी रजा घेतली नसल्याचे म्हटले होते. तर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपले वैयक्तिक जीवन असते. आणि त्यामुळे विराटला आपल्या पत्नीसोबत राहायचे असल्यास यात चुकीचे काहीच नाही, असे स्टीव्ह स्मिथने म्हटले होते.   


​ ​

संबंधित बातम्या