वर्ल्डकपच्या निर्णयासाठी सौरव गांगुली मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 June 2021

मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक होण्याच्या शक्यतेची तपासणी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची आयसीसीसाठी करमाफी या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई - मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक होण्याच्या शक्यतेची तपासणी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धेतून मिळणाऱ्या उत्पन्नाची आयसीसीसाठी करमाफी या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत दाखल झाले आहेत. बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात बीसीसीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या मुद्द्यांवर बैठक होणार आहे. 

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच यजमान भारत आहे; परंतु कोरोनामुळे देशातील सयोजन संकटात आहे. त्याच वेळी करमाफीचाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आयोजनाचे शिवधनुष्य बीसीसाआय पेलणार की नाही, हा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीकडे मुदतवाढ घेतलेली आहे; परंतु या महिन्याअखेर त्यांना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. 

२८ जूनपर्यंत बीसीसीआयने मुदत वाढ घेतलेली असली, तरी करमाफीबाबत उद्यापर्यंत निर्णय देणे आयसीसीला अपेक्षित आहे.


​ ​

संबंधित बातम्या