प्रशासकीय संकटामुळे दक्षिण आफ्रिका मंडळ निलंबित?

पीटीआय
Thursday, 22 April 2021

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळात सुरू असलेल्या प्रशासकीय संकटामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी भीती आफ्रिका क्रिकेट संघांच्या कर्णधारांनी व्यक्त केली आहे.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळात सुरू असलेल्या प्रशासकीय संकटामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी भीती आफ्रिका क्रिकेट संघांच्या कर्णधारांनी व्यक्त केली आहे. आपल्या मंडळाशी संबंधित चाहत्यांसह इतरांचीही त्यांनी माफी मागितली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डिन एल्गर, मर्यादित षटकांचा कर्णधार तेम्बा बावूमा आणि महिला कर्णधार डिन वॅन नेक्रिक यांनी एकत्रितपणे स्वाक्षरी केलेले एक पत्र प्रसिद्ध केले आहे, त्यात त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. पुरुषाचा ट्वेन्टी-२० विश्वकरंडक काही महिन्यांवर आलेला असताना आयसीसीकडून दक्षिण आफ्रिकेचा संघ, केवळ संघटनेत असलेल्या प्रशासकीय हस्तक्षेपामुळे निलंबित होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटपटू संघटनेच्या वतीने हे पत्र लिहिण्यात आले आहे. गेल्या १८ महिन्यांपासून क्रिकेट बोर्डात प्रशासकीय संकट आलेले आहे. केंद्रीय क्रीडा खाते क्रिकेट मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करत आहे. त्यांनीही संयम राखत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. १७ एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीतूनही काही निष्‍पन्न झाले नाही, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या