तब्बल 14 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील नवीन वर्षात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे तब्बल 14 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या भूमीवर क्रिकेट खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील नवीन वर्षात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे तब्बल 14 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या भूमीवर क्रिकेट खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आज याची पुष्टी केली आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान पाकिस्तानच्या संघासोबत दोन कसोटी आणि तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दोनही कसोटी सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहेत. 

कोरोनामुळे स्थगित झालेला इंग्लंडचा श्रीलंका दौरा ठरला  

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान कराची येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 4 ते 8 फेब्रुवारी मध्ये रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही संघातील तीन टी-ट्वेन्टी सामने लाहोर आणि रावळपिंडी याठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

पाकिस्तान मध्ये 2009 ला श्रीलंकेच्या संघावर आतंकवादी हल्ला झाला होता. त्यानंतर कोणताही देश पाकिस्तान मध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास तयार नव्हता. त्यामुळे पाकिस्तान मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र मागील वर्षी सप्टेंबर 2019 मध्ये श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला सुरवात झाली होती. श्रीलंकेच्या संघानंतर बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या संघांनी देखील पाकिस्तानचा यशस्वी दौरा केला होता. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौर्‍यावर येण्याची घोषणा केली आहे.         


​ ​

संबंधित बातम्या