आफ्रिका खेळाडूस कोरोना; इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द? 

संजय घारपुरे
Saturday, 5 December 2020

जैवसुरक्षित वातावरणातील खेळाडूस कोरोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका खेळण्याबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत मिळत आहे.

केपटाऊन : जैवसुरक्षित वातावरणातील खेळाडूस कोरोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका खेळण्याबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत मिळत आहे. आफ्रिकेच्या एका खेळाडूस कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील पहिली लढत दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आली. 

पाकिस्तान क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये सरावबंदीच 

इंग्लंड तसेच आफ्रिका संघांचा मुक्काम एकाच हॉटेलमध्ये आहे. जैवसुरक्षित वातावरणात मालिका होत आहे. दोन्ही संघांसाठी समान सुरक्षा आहे. या परिस्थितीत आफ्रिकेच्या खेळाडूस कोरोनाची बाधा कशी झाली, अशी विचारणा इंग्लंड संघव्यवस्थापनाने केल्याचे दक्षिण आफ्रिका संघासोबतचे वैद्यकीय अधिकारी शोएब मांजरा यांनी सांगितले. शनिवारी आफ्रिका तसेच इंग्लंड संघातील सर्व सदस्य तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होईल. त्यानंतरच मालिकेबाबतचा निर्णय होणार आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या विजयाची कारणे

आफ्रिका संघाकडून नक्कीच जैवसुरक्षित वातावरणाचा भंग झाला आहे. हे कसे घडले, याची चौकशी सुरू आहे. आम्ही सीसीटीव्हीचीही यासाठी मदत घेत आहोत, असे मांजरा यांनी सांगितले; पण त्याच वेळी त्यांनी संघातील एकही खेळाडू हॉटेलबाहेर गेला नसल्याचे सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या