RSA vs PAK : बाबरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानची विजयी सलामी
कर्णधाराने शतकी खेळी करुन सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. नॉर्तजेनं ही जोडी फोडली. बाबर आझम 103 धावा कुरन तंबूत परतला.
कर्णधार बाबर आझमच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेला पहिला सामना 3 विकेट्स राखून जिंकत पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणले. मध्य फळीतील फलंदाज व्हॅन डर डुसेन याने केलेली 123 धावांची नाबाद शतकी खेळी आणि त्याला मिलरने 50 धावां करुन दिलेली साथ याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकात 273 धावांपर्यंत मजल मारली होती.
या दोघांशिवाय तळाच्या फलंदाजीतील फेहलुकवायो याने 29 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने 61 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या. हॅरिस रौफ याने 72 धावा खर्च करुन दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद हुसेन आणि फहिम अशरफ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. इमाम उल हक आणि फखर झमान यांनी दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी संघाच्या डावाला सुरुवात केली. पाकिस्तानच्या धावफलकावर अवघ्या 9 धावा असताना फखर झमानच्या रुपात रबाडाने संघाला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर इमाम उल हक याने कर्णधार बाबर आझमसोबत 177 धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले.
IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स
कर्णधाराने शतकी खेळी करुन सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. नॉर्तजेनं ही जोडी फोडली. बाबर आझम 103 धावा कुरन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ नोर्तजेनं इमाम उल हक याला रबाडाकरवी झेलबाद केले. त्याने 80 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. मोहम्मद रिझवान 40 धावांची भर घालून माघारी फिरल्यानंतर सामना पुन्हा फिरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला होता. शदाब खानने 33 उपयुक्त धावा करुन संघ अडचणीत येणार नाही, अशी खेळी केली. अशरफने नाबाद 5 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. दक्षिण आफ्रिकेकडून नोर्तजेनं सर्वाधिक 4 गडी बाद केले. फेहुलकवायो दोन आणि रबाडाला एक गडी बाद करण्यात यश आले.