पूनम राऊतचं शतक वाया; भारतीय महिलांचा आणखी एक पराभव  

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 14 March 2021

या विजयासाह दक्षिण आफ्रिका संघानं पाच सामन्याच्या मालिकेत ३-१ च्या फरकानं आघाडी घेतली

चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकाचे महिला संघानं भारतीय महिल संघाचा पराभव केला. या विजयासाह दक्षिण आफ्रिका संघानं पाच सामन्याच्या मालिकेत ३-१ च्या फरकानं आघाडी घेतली आहे.  पूनम राऊतच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघानं निर्धारित ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २६६ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, गोलंदाजांनी केलेल्या कमकवुत कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभव पाहावा लागला. 

भारतीय महिला संघानं दिलेलं २६७ धावांचं लक्ष तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. दक्षिण आफ्रिकेकडून लिजेल (69), मिगनोन डु प्रीज (61), लारा गुडॉल (नाबाद 59) आणि कर्णदार लॉरा वोलवार्ट (53) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ८ चेंडू राखून विजय संपादन केला.  २६९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला तगडी सुरुवात मिळाली. पहिल्या आणि तिसऱ्या गड्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाकडून १०० पेक्षा जास्त धावांची भागिदारी झाली आहे.

पूनम राऊतची शतकी खेळी

पूनम राऊत ही सध्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या दोन सामन्यात तिने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या सामन्यात पूनमने शतकी खेळी केली. तिने १२३ चेंडूत १० चौकारांसह तिने नाबाद १०४ धावा केल्या.  हे तिचं तिसरं शतक होय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक कऱणाऱ्या महिलांमध्ये पूनम १९ व्या स्थानी आहे. तर सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये ती तिसऱ्या स्थानावर आहे. पूनम राऊतने ७१ व्या सामन्यात ही कामगिरी केली असून तिच्यापेक्षा जास्त मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी शकते केली आहे. भारताची महिला टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेसुद्धा आतापर्यंत तीन एकदिवसीय शतके केली आहेत. 

 

मिताली 'राज'; महिला क्रिकेटरची पहिल्यांदाच अशी कामगिरी
चौथ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आणखी एक विक्रम केला आहे. याआधीच्या सामन्यात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. लखनऊमध्ये होत असलेल्या सामन्यात मिताली राजने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामिगिरी करणारी ती जगाती पहिलीच महिला फलंदाज ठरली आहे. मिताली राजने 213 व्या सामन्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सात हजार धावांचा टप्पा ओलांडला
 


​ ​

संबंधित बातम्या