श्रीलंका क्रिकेटपटूंनी करार फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

श्रीलंका क्रिकेटपटूंनी नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यांना यासाठी असलेली मुदत शनिवारी संपली. करारावर स्वाक्षरी केली नसली तरी श्रीलंका खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी दाखवली आहे.

कोलंबो - श्रीलंका क्रिकेटपटूंनी नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यांना यासाठी असलेली मुदत शनिवारी संपली. करारावर स्वाक्षरी केली नसली तरी श्रीलंका खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी दाखवली आहे.

श्रीलंका मंडळाने मानधन कमी करताना जागतिक क्रमवारीत सरस असलेल्या संघांना हरवल्यास बोनस देण्यात येईल असे सांगितले आहे. हे श्रीलंका खेळाडूंना मान्य नाही. सध्या श्रीलंका कसोटी तसेच ट्वेंटी २० क्रमवारीत आठवे, एकदिवसीय क्रमवारीत नववे आहेत. नव्या करारात अँजेलो मॅथ्यूज, दिमुथ करुणारत्ने यांचे नुकसान झाले. मॅथ्यूजला गतवर्षीच्या एक लाख ३० हजार डॉलरऐवजी ८० हजार; तर करुणारत्ने याला एका लाखाऐवजी ७० हजार मिळतील.


​ ​

संबंधित बातम्या