कोरोना चाचणीत श्रीलंका खेळाडू निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

श्रीलंका क्रिकेट संघातील सर्व खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका नव्या कार्यक्रमानुसार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघातील सर्व खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका नव्या कार्यक्रमानुसार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

श्रीलंका संघातील खेळाडूंची नव्याने चाचणी घेण्यात आली. संघाचे फलंदाज मार्गदर्शक ग्रँट फ्लॉवर, डाटा विश्लेषक जी टी निरोशान, तसेच एक खेळाडू बाधित झाल्याने १३ जुलैपासून सुरू होणारी मालिका पाच दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

चाचणीचा अहवाल आम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मिळतो. अर्थात कोणी बाधित असल्यासच ते कळवण्यात येते. आता काहीही कळवले नसल्यामुळे कोणीही बाधित नसेल, असे गृहीत धरण्यास काहीच हरकत नाही, असे श्रीलंका क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या