WIvsSL 2nd Test : कॅरेबियनच्या तावडीतून लंकेची सुखरुप सुटका

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

होल्डरने 71 धावांची नाबाद खेळी करत वेस्ट इंडिजने श्रीलंकेच्या संघासमोर 385 धावांचे आव्हान ठेवले होते. 

अँटिग्वाच्या मैदानात रंगलेला वेस्टइंडिज आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. कर्णधार क्रॅग ब्रँथवेटने केलेल्या 126 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 354 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय रहकिम कॉर्नवॉल याने 73 धावांची लक्षवेधी खेळी केली होती. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात श्रीलंकेकडून लकमलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. चमिराला 3, फर्नांडो, एम्बुल्डेनिया आणि धनंजया डिसिल्वा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

श्रीलंकेला पहिल्या डावात फार उत्तम फलंदाजी करता आली नाही. थिरिमाने 55, पाथुम निसानका 51 यांनी केलेली अर्धशतके चंडिमल 44, धनंजया डिसिल्वाच्या 39, डिक्वेला 20 आणि फर्नांडो 18 धावा वगळता अन्य कोणत्याही श्रीलंकन फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी श्रीलंकेचा पहिला डाव 258 धावांतच आटोपला. 104 धावांची आघाडीसह वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव 4 बाद 280 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावातही ब्रेथवेटने 85 धावांची खेळी केली. जॉन कॅम्पेबल 10, ब्लॅकवूड 18 धावा करुन माघारी फिरल्यानंतर मेयर्सने 55 धावा केल्या. होल्डरने 71 धावांची नाबाद खेळी करत वेस्ट इंडिजने श्रीलंकेच्या संघासमोर 385 धावांचे आव्हान ठेवले होते. 

IPL 2021 : दिल्ली वर्सेस चेन्नई सामन्यापूर्वी टेन्शन; वानखेडेवरील 8 कर्मचाऱ्यांना कोरोना

वेस्ट इंडिजला सामना जिंकण्याची संधी निश्चितच होती. पण गोलंदाजांना चमकदार कामगिरी दाखवून संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही.  थिरिमाने 39 धावांवर बाद झाल्यानंतर कॅप्टन करुणारत्ने याने 176 चेंडूत केलेली 75 धावांची खेळी आणि फर्नांडोने केलेल्या नाबाद 66 धावांच्या जोरावर श्रीलंकेला कसोटी वाचवण्यात यश आले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यातील टी-20 आणि वनडे मालिकेत श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामनाही निकालाशिवाय संपल्यामुळे दोन्ही संघातील कसोटी मालिका अनिर्णित राहिली. टी-20 आणि वनडे मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेला थोडा दिलासाच मिळाला असे म्हणावे लागेल. भारत भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या