श्रीलंकेने तिसऱ्या सामन्यासह टी-२० मालिका जिंकली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

प्रमुख फलंदाज नसल्यामुळे कमकुवत झालेली भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या फिरकी माऱ्यासमोर निष्प्रभ ठरली. सलग दुसरा सामनाही गमाविल्यामुळे  श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका १-२ अशी गमाविण्याची वेळ आली. भारताला अवघ्या ८१ धावा करता आल्या श्रीलंकेने हे आव्हान १४.३ षटकांत पार केले.

कोलंबो - प्रमुख फलंदाज नसल्यामुळे कमकुवत झालेली भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या फिरकी माऱ्यासमोर निष्प्रभ ठरली. सलग दुसरा सामनाही गमाविल्यामुळे  श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका १-२ अशी गमाविण्याची वेळ आली. भारताला अवघ्या ८१ धावा करता आल्या श्रीलंकेने हे आव्हान १४.३ षटकांत पार केले.  

कधी नव्हे तो आज शिखर धवनने नाणेफेक जिंकली, परंतु प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अंगलट आला. स्वतः भोपळाही फोडू शकला नाही. बघता बघता निम्मा संघ ३६ धावांत गारद झाला. अर्धशतकी मजलही त्यावेळी अशक्य वाटत होती. हसारंगाचे चेंडू खेळणे सर्वांनाच कठीण जात होते. भुवनेश्वर आणि कुलदीप यांनी थोडाफार प्रतिकार केल्यामुळे भारताला जेमतेम ८१ धावा करता आल्या. भारताकडे आयपीएलचा अनुभव असलेले फिरकी गोलंदाज होते, परंतु ते श्रीलंकेच्या गोलंदाजांप्रमाणे प्रभाव पाडू शकले नाहीत. अपवाद राहुल चहरचा, त्याने तीन विकेट मिळविल्या, परंतु कुलदीप आणि वरुण अपयशी ठरले.

संक्षिप्त धावफलक - भारत - २० षटकांत ८ बाद ८१ (ऋतुराज गायकवाड १४, भुवनेश्वर कुमार १६, कुलदीप यादव २३, हसारंगा ९ धावांत ४, दुसान शनाका २० धावांत २) पराभूत वि. श्रीलंका - १४.३ षटकांत ३ बाद ८२ (मिनोद भानुका १८, धनंजया डिसिल्वा नाबाद २३, राहुल चहर १५-३.


​ ​

संबंधित बातम्या